Trojan D'mello: सक्तीची निवृत्ती म्हणजे भाजप समर्थकांना मागच्या दाराने प्रवेश

तृणमूल काँग्रेसची गोवा सरकारवर सडकून टीका
Goa TMC
Goa TMCDAINIK Gomantak
Published on
Updated on

प्रशासकीय सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रमोद सावंत सरकारने आज्ञा न मानणाऱ्या, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. नुकतंच सामान्य प्रशासन विभागाने याबाबत मंगळवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी निवेदन जारी केले आहे. यावरुन तृणमूल काँग्रेसने गोवा सरकारवर सडकून टीका केली आहे.

(TMC demands clarity on goa forced retirement of govt staff)

Goa TMC
Goa News: गोवा हद्दीत कर्नाटकी ट्रॉलर्सकडून बुलट्रॉलिंग!

मिळालेल्या माहितीनुसार गोवा तृणमूल काँग्रेसने ( TMC ) या धोरणावरुन गोवा सरकारला धारेवर धरत सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीसाठीचे धोरण म्हणजे मंत्री आणि भाजपशी संबंध असलेल्या तरुणांना मागच्या दाराने प्रवेश देण्यासाठीचा प्रयत्न असल्याचं म्हटले आहे. तसेच प्रमोद सावंत सरकारने सेवानिवृत्तीच्या नियमांशी छेडछाड केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Goa TMC
'IIT' च्या सीमांकनासाठी लवकरच सुरुवात; स्थानिकांचा विरोध कायम

पत्रकार परिषदेत बोलताना तृणमूलचे माध्यम समन्वयक ट्रोजन डी’मेलो (Trojan D'mello ) म्हणाले की, धोरण लागू करण्यापूर्वी सरकारने “सुस्त” आणि “नॉन-परफॉर्मिंग” सरकारी कर्मचाऱ्यांचा अर्थ स्पष्ट करणे आवश्यक आहे.हे धोरण म्हणजे “भाजप सरकार सेवानिवृत्तीच्या नियमात छेडछाड करण्याचा प्रयत्न करत आहे. यातुन पसंतीच्या तरुणांसाठी मार्ग काढण्याची एक छुपी रणनीती आहे. असा टोला ही त्यांनी लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com