Morjim village panchayat secretary assault Dainik Gomantak
गोवा

Pernem: 'बाहर आ.. तेरे को ठोक दूंगा'! दिल्लीकर बाप-लेकावर कारवाई करा; पं.सचिव संघटनेची मागणी

Morjim secretary assault: संघटनेचे अध्यक्ष शशांक गावस देसाई म्हणाले की,या पूर्वीही पंचायत कार्यालयात असे प्रकार घडले, पण तेव्हा आमची संघटना नव्हती.

Sameer Panditrao

पेडणे: पेडणे गटविकास कार्यालयात मोरजी ग्रामपंचायतीचे सचिव सचिन धाउसकर यांच्यावर मूळ दिल्ली येथील पिता-पुत्राने केलेल्या हल्ल्यासंबंधी अखिल गोवा ग्रामपंचायत सचिव संघटनेच्या वतीने आज पेडणे गटविकास कार्यालयाच्या अधिकारी निक्षा नाईक तसेच पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन लोकरे यांच्याशी चर्चा करून दोन्ही संशयितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करून पेडणे पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले.

अखिल गोवा ग्रामपंचायत सचिव संघटनेचे अध्यक्ष शशांक गावस देसाई व सचिव गोकुळदास कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज राज्याच्या विविध भागातील अनेक पंचायत सचिव पेडणे येथील गटविकास कार्यालयात येऊन बीडीओ कार्यालय अधिकारी निक्षा नाईक यांची भेट घेतली व काल गटविकास कार्यालय येऊन मोरजी ग्रामपंचायतीचे पंचायत सचिव सचिन धाउ सकर यांच्यावर हल्ला करून त्यांना केलेल्या मारहाणी संबंधी खंत व्यक्त करून या घटनेचा निषेध केला.

संघटनेचे अध्यक्ष शशांक गावस देसाई म्हणाले की,या पूर्वीही पंचायत कार्यालयात असे प्रकार घडले, पण तेव्हा आमची संघटना नव्हती. आता आम्ही पंचायत सचिव संघटित आहोत पंचायत सचिवाला मारहाण करण्याचा हा प्रकार थेट पंचायतींचे मुख्य गट कार्यालय असलेल्या ठिकाणी झाला.

ही त्याहून अत्यंत गंभीर बाब आहे. अशा प्रकारे जर पंचायत सचिवावर हल्ले झाले तर सगळीकडे एक चुकीचा संदेश जाणार आहे,असेही देसाई म्हणाले.

गोकुळदास कुडाळकर,संघटनेचे सचिव

गटविकास कार्यालयात येऊन संशयित पंचायत सचिवांना मारहाण करतात, हे निंदनीय आहे. ‘दो टके का सचिव मेरा एनओसी कैसे रोक सकता है?, दो महिनेमे तेरे हाथ में सस्पेन्शन ऑर्डर दूंगा. बाहर आ तेरे को ठोक दूंगा’.ही उद्दाम भाषा हे लोक कुणाच्या जीवावर बोलतात. मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन या अशा उद्दामांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT