Goa News: पेडणे तालुक्यातील धारगळ, पत्रादेवी, नगरपालिका क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, आमदार आर्लेकरांची मागणी

Goa Updates: जाणून घ्या गोवा अधिवेशनातील ठळक घडामोडी. गोव्यातील राजकीय बातम्या मराठीमध्ये.
Pravin Arlekar
Pravin ArlekarDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे तालुक्यातील धारगळ, पत्रादेवी, नगरपालिका क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरांची गरज असून सीएसआर निधीतून सीसीटीव्ही बसविण्याचे काम करावे, अशी आमदार प्रविण आर्लेकर यांनी मागणी केलीय.

माजी राज्यपाल स्व. सत्यपाल मलिक यांना विधानसभेत श्रद्धांजली

माजी राज्यपाल स्व. सत्यपाल मलिक यांना विधानसभेत एक मिनिट स्तब्धता पाळून‌ श्रद्धांजली वाहण्यात आली.

गोमंतक गौड मराठा समाज संस्थेवर प्रशासक नेमण्यास सरकारला ११ महिने का लागले?

आमदार गोविंद गावडे यांनी गोमंतक गौड मराठा समाज संस्थेवर प्रशासक नेमण्यास सरकारला ११ महिने का लागले असा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला

होंडा आयडीसी येथे घराला आग लागून मोठे नुकसान

होंडा आयडीसी येथे शेवंती माईनकर यांच्या घराला आग लागून मोठे नुकसान; वाळपई अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन

"मोपा विमानतळावरील ९ दुकाने स्थानिक चालवत नाहीत" युरी

युरी आलेमाव यांनी मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ११ दारू दुकानांचा मुद्दा उपस्थित करत, त्यापैकी ९ दुकाने स्थानिक नसलेल्या लोकांकडून चालवली जातात, असे नमूद केले. कारवाईच्या आवाहनानंतर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहाला चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

आलेमाव यांनी वनहक्क दाव्यांचा मुद्दा उपस्थित केला

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सभागृहात ३१ मार्च २०२६ पर्यंत उर्वरित ६९०६ वनहक्क दावे निकाली काढण्याचे आश्वासन दिले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी समुदायांना लवकरात लवकर न्याय देण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केला.

'एसटी' कर्मचार्‍य‍ांना ६ महिन्य‍ांत बढत्या!

सरकारी खात्यांतील 'एसटी' कर्मचार्‍यांच्या बढत्यांचा विषय पुढील ६ महिन्यांत संपवू. एसटींसाठी असलेल्या प्रलंबित राखीव जागा लवकरच कर्मचारी भरती अायोगामार्फत भरल्या जातील : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

एसटी राजकीय आरक्षणावरून सभागृहात खडाजंगी!

  • राज्यातील अनुसूचित जमातीची (एसटी) केवळ राजकीय आरक्षणाची मागणी प्रलंबित. संसदेत हे विधेयक आले पण काँग्रेस खासदारांनी कामकाज चालू न दिल्याने हे विधेयक रखडले. याला केवळ काँग्रेस जबाबदार. हे विधेयक पुन्हा आणून त्याला मंजुरी देण्याची मागणी केंद्राकडे केली आहे : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

  • आमदार विरेश बोरकर यांच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री-विरोधकांत शाब्दिक युद्ध

पाच दुकाने फोडून लाखोंचा ऐवज लंपास

दोनमाड-केरी, येथे चोरट्यांनी सलग पाच दुकाने फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. पोलिस घटनास्थळी दाखल. तपास सुरू

पहाटे उड्डाण पुलावर पर्वरीतील एक 27 वर्षीय युवती नग्न व बेशुद्धावस्थेत सापडली

बस्तोडा, बार्देश येथील उड्डाण पुलावर मंगळवारी पहाटे पर्वरीतील एक 27 वर्षीय युवती नग्न व बेशुद्धावस्थेत सापडली. म्हापसा जिल्हा इस्पितळातून उपचारानंतर सदर युवतीला बांबोळीला आयपीएचबीमध्ये केले भरती

कर्नाटक राज्यातून आणलेले अंदाजे 420 किलो गोमास जप्त

मोले चेकपोस्ट येथे इनोव्हा कार गाडीतून कर्नाटक राज्यातून आणलेले अंदाजे ४२० किलो गोमास रात्री अडीचच्या सुमारास कुळे पोलिसांनी पकडले.चालक ताब्यात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com