Pernem Crime Update Dainik Gomantak
गोवा

Pernem Theft: पेडण्यात दिवसाढवळ्या घरफोडी; 4.5 लाखांचा ऐवज लंपास, घर बंद असताना मारला डल्ला

House Robbery Pernem: या घरफोडीत सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तूंसह सुमारे ४.५ लाख रुपयांचा ऐवज लंपास

Akshata Chhatre

पेडणे: गोव्यात सध्या गुन्हेगारीने डोके वर काढले असून, चोरट्यांनी आता दिवसाढवळ्या घरफोड्या करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर गोव्यात पेडणे तालुक्यातील कोंडळवाडा येथे सोमवारी (दि. १४) सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान एका घरात अज्ञात चोरट्यांनी हात साफ केला. या घरफोडीत सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तूंसह सुमारे ४.५ लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची माहिती मिळाली आहे.

कुटुंब घराबाहेर असताना चोरट्यांचा डल्ला

घराचे मालक म्हणाले की, ही घटना सोमवारी (१४ जुलै) सकाळी ११ ते १२ च्या सुमारास घडली, जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य घराबाहेर गेले होते. दुपारी १२ च्या सुमारास त्यांची पत्नी घरी परतल्यावर ही चोरी उघडकीस आली. घरात प्रवेश करताच त्यांना घरातील वीज चालू दिसली आणि मुख्य दरवाजाचे कुलूप कटरने तोडलेले आढळले.

या घटनेपूर्वी काही स्थानिकांनी परिसरात नंबर प्लेट नसलेल्या स्कूटरवरूनफिरणाऱ्या दोन संशयित व्यक्तींना पाहिले होते, अशी माहिती घरमालकाने दिली आहे. चोरट्यांनी घरातून एक लॅपटॉप, १.२ लाख रुपये रोख रक्कम आणि २.७५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ज्यात दोन मंगळसूत्र आणि एक ब्रेसलेट यांचा समावेश होता, घेऊन पोबारा केल्याचा आरोप आहे.

पोलिसांकडून तपास सुरू, तरीही धास्ती कायम

घटनेची माहिती मिळताच पेडणे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. फॉरेन्सिक तज्ञ आणि श्वान पथकालाही बोलावण्यात आले होते. गुन्हेगारांचे धागेदोरे शोधण्यासाठी घटनास्थळावरून फिंगरप्रिंट्स गोळा करण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly: गोवा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार, विरोधी पक्षाकडून अल्टोन डिकोस्टा रिंगणात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव अद्याप गुलदस्त्यात

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Goa Taxi Issue: 'विश्वास ठेवला अन् सरकारनं फसवलं'; टॅक्सी व्यावसायिकांची मंत्रालयाबाहेर गर्दी, सीएमनी दिला Busy असल्याचा मेसेज

Nano Banana Trend: CM सावंतांचा डिजिटल अवतार! नॅनो बनाना ट्रेण्डचा 'नवा लूक' सोशल मीडियावर Viral

Marathi: 'हा भाषेचा नाही, पोर्तुगिजांच्या 450 वर्षांच्या छळातून रक्षण केलेल्या भवितव्याचा प्रश्न'; मराठी राजभाषा बैठकीत चर्चा

SCROLL FOR NEXT