Goa Foreigner Criminal Case Dainik Gomantak
गोवा

जपानी आरोपीच्या फ्रान्स दौऱ्यास मान्यता, अटी घालून परदेश प्रवासास परवानगी

Goa Foreigner Criminal Case: त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ आणि ३३८ अंतर्गत गुन्हे दाखल असून संबंधित खटला न्यायालयात प्रलंबित आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: पेडणे येथील प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी न्यायालयाने एका प्रलंबित फौजदारी खटल्यातील आरोपी असलेल्या जपानी नागरिक मेरिसा तामाडा यांना व्यावसायिक कारणासाठी फ्रान्सला जाण्याची परवानगी दिली आहे. १७ जून २०२६ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत त्यांना परदेश प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

मेरिसा तामाडा या गेली १९ वर्षे दरवर्षी फ्रान्समध्ये स्फटिक व दागिन्यांच्या व्यवसायासाठी जात असून त्या जपानच्या पासपोर्टधारक आहेत.

त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ आणि ३३८ अंतर्गत गुन्हे दाखल असून संबंधित खटला न्यायालयात प्रलंबित आहे.

परदेशी नागरिक असल्याने आरोपी कायदेशीर प्रक्रियेतून दूर राहण्याची किंवा परत न येण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला होता.

न्यायालयाने आरोपीचा पासपोर्ट, व्हिसा तसेच पूर्वीच्या परदेश प्रवासाचा इतिहास तपासल्यानंतर सरकारी पक्षाची भीती निराधार असल्याचे नमूद केले.

योग्य अटी घालून ही समस्या सोडवता येऊ शकते, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने मेरिसा तामाडा यांना निर्धारित कालावधीसाठी फ्रान्सला जाण्याची परवानगी मंजूर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT