Cyber Crime: मैत्रीचा असाही 'घात'! सोशल मीडियावर ओळख वाढवून घातला कोटींचा गंडा; उत्तर प्रदेश पोलिसांकडून एकाला बेड्या

Muzaffarnagar Cyber Crime Facebook Fraud: सोशल मीडियाचा अतिवापर आणि अनोळखी व्यक्तींवर ठेवलेला आंधळा विश्वास कसा महागात पडू शकतो, याचे एक धक्कादायक उदाहरण उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमधून समोर आले.
Muzaffarnagar Cyber Crime Facebook Fraud
Cyber CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Online Trading Scam Dgxc Website: सोशल मीडियाचा अतिवापर आणि अनोळखी व्यक्तींवर ठेवलेला आंधळा विश्वास कसा महागात पडू शकतो, याचे एक धक्कादायक उदाहरण उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमधून समोर आले. मुजफ्फरनगरच्या सायबर क्राईम पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करुन ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल 1.01 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या टोळीच्या एका सदस्याला अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल फोन जप्त केला. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांचे एक मोठे जाळे उघडकीस आले असून सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी हा एक मोठा धडा ठरला.

या प्रकरणातील पीडित व्यक्तीला काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर 'गीतिका कपूर उर्फ जीजी' नावाच्या अकाऊंटवरुन फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. पीडिताने ती स्वीकारल्यानंतर संशयित महिलेने चॅटिंगच्या माध्यमातून हळूहळू भावनिक संबंध निर्माण केले आणि पीडिताचा पूर्ण विश्वास संपादन केला. विश्वास जिंकल्यानंतर तिने पीडिताला 'DGXC' नावाच्या एका बनावट वेबसाईटवर ऑनलाईन ट्रेडिंग आणि गुंतवणुकीसाठी (Investment) प्रवृत्त केले. यानंतर पीडिताला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले, जिथे इतर गुंतवणूकदारांना होणारा फेक प्रॉफिट दाखवून त्याला आपल्या जाळ्यात ओढले.

Muzaffarnagar Cyber Crime Facebook Fraud
Uttar Pradesh Storm: उत्तर प्रदेशात वादळ आणि पावसाचे 100 बळी, जनजीवन विस्कळीत; बाधितांना आर्थिक मदत देण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

या खोट्या प्रॉफिटला भुलून पीडिताने वेगवेगळ्या तारखांना विविध बँक खात्यांमध्ये एकूण 1,01,02,000 रुपये जमा केले. वेबसाईटवर पीडिताला करोडो रुपयांचा प्रॉफिट दिसत होता, परंतु जेव्हा त्याने पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी फायनल व्हेरिफिकेशन, डेटा रिपेअरिंग आणि अँटी मनी लॉन्ड्रिंग प्रक्रियेच्या नावाखाली आणखी पैशांची मागणी करत दबाव वाढवला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडिताने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Muzaffarnagar Cyber Crime Facebook Fraud
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

पीडिताच्या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजय कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकाने वेगाने चक्र फिरवून बलवंत नावाच्या आरोपीला अटक केली. पोलिसांच्या सखोल तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या सेंट्रल बँक खात्यावर आधीच 12 तक्रारी नोंद असून त्यातून 8.42 कोटींची फसवणूक झाली. तसेच, त्याच्या आयडीबीआय (IDBI) बँक खात्याशी संबंधित 5 तक्रारींमध्ये 24.71 लाख आणि ॲक्सिस बँक खात्यावरील 36 तक्रारींमधून तब्बल 29.11 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी आतापर्यंत फसवणूक झालेल्या रकमेपैकी 24.71 लाख रुपये फ्रीज केले असून ते पीडिताच्या खात्यात परत करण्याची प्रक्रिया सुरु केली.

Muzaffarnagar Cyber Crime Facebook Fraud
Uttar Pradesh Crime: धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःच केली लिंगबदल शस्त्रक्रिया, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

उत्तर प्रदेश सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या सायबर गुन्हेगारी विरोधी मोहिमे अंतर्गत पोलीस अधीक्षक (गुन्हे) इंदु सिद्धार्थ यांच्या देखरेखीखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 5 मोबाईल, 2 लॅपटॉप, 15 एटीएम कार्ड आणि रोकड जप्त करण्यात आली होती. प्रभारी निरीक्षक कर्मवीर सिंह, उपनिरीक्षक महेंद्र सिंह आणि सायबर पथकातील सहकाऱ्यांनी या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून पोलीस आता या टोळीच्या इतर सदस्यांचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com