Goa Mineral Auction Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: अन्‍य राज्यांना गोव्यातून खनिज माल निर्यात करण्यास परवानगी

खनिज निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने इतर राज्यातील निर्यातदारांना गोव्यातून खनिज माल निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Mining: खनिज निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने इतर राज्यातील निर्यातदारांना गोव्यातून खनिज माल निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. मंत्रिमंडळानेच असा निर्णय घेतला असून खनिज खात्याच्या वतीने हा बदल अधिसूचित करण्यात आला आहे,

अशी माहिती खाण खात्याच्या वतीने देण्यात आली आहे. याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार आहे.

खाण खात्याचे संचालक डॉ. एस. शानभोग यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापुढे इतर राज्यांतील निर्यातदार, खनिज व्यावसायिक, ई-लिलावातील यशस्वी बोलिधारक गोव्यातून खनिज निर्यात करू शकतात.

याचा फायदा राज्यातील खनिज ने-आण करणारे ट्रक, बार्ज व्यावसायिक, मुरगाव पोर्ट प्राधिकरणाला होणार आहे. खनिज व्यावसायिकांच्या व्यवसाय वाढीसह राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होणार आहे.

ट्रक, बार्ज व्यवसाय पुनर्जिवीत

केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीमुळे राज्यात 2014 पासून खनिज व्यवसाय बंद आहे. याचा विपरित परिणाम या व्यवसायावर अवलंबून असलेल्या ट्रक, बार्ज व्यवसायावर झाला असून तेव्हापासून हा व्यवसाय पूर्णतः ठप्प आहे.

आता राज्य सरकारने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे हे दोन्हीही व्यवसाय पुनर्जीवित होतील अशी अपेक्षा असून याचा सर्वात मोठा लाभ मुरगाव बंदर प्राधिकरणाला होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT