Fraud In Vasco| Houses Dainik Gomantak
गोवा

Fraud In Vasco: फ्लॅट, प्लॉट देण्याच्या बहाण्याने वास्कोतील अनेकांची फसवणूक

वास्कोत हाउसिंग काॅलनीत फ्लॅट देतो, तसेच प्लॅाट देतो असे सांगून अनेकांना 1 कोटी रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण उघड झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Fraud In Vasco: फ्लॅट, प्लॉट विकण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्यांचे आणखी एक प्रकरण वास्कोत उघडकीस आले असून फसवणूक झालेल्यांनी या प्रकारची तक्रार वास्को पोलिसात दाखल करण्यास धाव घेतली आहे.

सात आठ महिन्यांपूर्वी गरजू लोकांकडून लाखो रुपये गोळा करून फ्लॅटमध्ये विनाभाडे रहा असे सांगून गंडा घातलेल्या नूर अहमद नंतर आता अशाप्रकारचे फ्लॅट देण्याच्या बहाण्याने गंडविलेल्या लोकांनी वास्को पोलिस स्थानकात धाव घेऊन चार ठकसेनांविरुध्द तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मोठे रॅकेट असल्याचा दावा फसवणूक झालेल्या लोकांनी केला आहे.

फसवणुकीचे आणखी एक प्रकरण उघड

उपासनगर येथे हाउसिंग काॅलनीत फ्लॅट देतो, तसेच प्लॅाट देतो असे सांगून अनेकांना 1 कोटी रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण उघड झाले आहे. तक्रारदाराकडून 5 लाख रुपयांचा धनादेश, एक लाख रुपये आगाऊ रक्कम गोळा करून कोट्यवधी रुपयांना गंडा ठकसेनांनी घातला.

आपण गंडावले गेल्याचे कळताच काल त्यांनी वास्को पोलिस स्थानकात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. सात आठ महिन्यांनंतर वास्कोत घडलेले हे फसवणुकीचे आणखी एक प्रकरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT