Water  Dainik Gomantak
गोवा

पर्वरीत पाण्याची कमतरता भासणार नाही

लोकांचे टाकीमधून वाहून जाणाऱ्या पाण्याकडे लक्ष नसते, असे पर्वरी पब्लिक वॉटर डिपार्टमेंटचे प्रभारी म्हणाले.

दैनिक गोमन्तक

पणजी: पर्वरी पब्लिक वॉटर डिपार्टमेंटचे (PWD) (पाणी पुरवठा) प्रभारी यांनी लोकांना काळजीपूर्वक पाण्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. “पाणी बील ग्राहकांच्या पाण्याच्या वापरावर अवलंबून असते. जर वापर जास्त असेल तर साहजिकच मोठ्या प्रमाणात पाणी बील येणार, म्हणून मी ग्राहकांना कमी पाणी वापरण्याचे आवाहन करतो,” अधिकारी म्हणाले.

"लोकांचे टाकीमधून वाहून जाणाऱ्या पाण्याकडे (Water) लक्ष नसते. मात्र, वाढीव पाणी बील येताच ते कार्यालयाकडे तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतात. लोकांनी आपल्या टाक्या दुरुस्त करून घ्याव्यात. घरात पाण्याची गळती असल्यास ती काढावी," असे अधिकारी म्हणाले.

"ज्या ग्राहकांच्या घरात फंक्शनल मीटर आहे आणि ते 16 क्यूबिक मीटर पाण्याचा वापर करतात त्यांना पाणी शुल्क आणि मीटरच्या भाड्यातून सूट देण्यात येईल. लोकांना माहित नाही की सरकारने (Government) सप्टेंबर 2021 पासून घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांसाठी पाणी बिलाची रक्कम आधीच वाढवण्यात आली आहे,” ते पुढे म्हणाले.

आजकाल, पर्वरीमधील काही भागात रात्री उशिरा किंवा सकाळी 9 नंतर पाणीपुरवठा होतो. हाऊसिंग बोर्ड परिसरातील नवीन जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी सुरू असल्याने असे होत आहे. पर्वरी (Porvorim) जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर पर्वरी भागात पाण्याची कमतरता भासणार नाही, ते पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

MP Liquor Death: मध्य प्रदेशात विषारी दारूचा हाहाकार! 9 जणांचा मृत्यू, 10 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक

Tarun Tejpal: तरुण तेजपालच्या शिक्षावाढीच्या याचिकेला ब्रेक! सर्वोच्च न्यायालयात सुनावणी तहकूब

खरी कुजबुज: फातोर्ड्यात नक्की कोण?

SCROLL FOR NEXT