People from Maharashtra enter Goa by crossing the border  Dainik Gomantak
गोवा

'नाकाबंदी' चुकवून चोरवाटांनी महाराष्ट्रातून गोव्यात प्रवेश

महाराष्ट्रातील (Maharashtra) दोडामार्ग तालुक्यातून अनेकजणांची नियमितपणे डिचोली (Bicholim) भागात ये-जा सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: "कोविड" (Covid-19) संसर्गाचा धोका टाळण्यासाठी सीमा 'सील' करून गोव्यात (Goa) येणाऱ्या प्रवाशांची रॅपिड अँटीजेन चाचणी सक्तीची केली असली, तरी महाराष्ट्रातील (Maharashtra) दोडामार्ग तालुक्यातून अनेकजणांची नियमितपणे डिचोली भागात ये-जा सुरु आहे. 'नाकाबंदी' चुकवून चोरवाटांनी (आडमार्ग) महाराष्ट्रातील हे लोक कामधंद्यानिमित्त 'सिमोल्लंघन' करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. डिचोली आणि महाराष्ट्राला जोडलेल्या दोडामार्ग तपासणी नाक्यावर कडक 'नाकाबंदी' करण्यात आली आहे. (People from Maharashtra enter Goa by crossing the border without covid negative certificate

या नाक्यावरुन गोव्यात (डिचोली आणि म्हापसाच्या दिशेने) येणाऱ्या ज्या प्रवाशांजवळ 'कोविड' निगेटिव्ह प्रमाणपत्र नाही, त्यांची सक्तीने रॅपिड अँटीजेन चाचणी (आरएटी) करण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूने दोडामार्ग तालुक्यातील माटणे भागाला जोडून असलेल्या म्हावळींगे येथील गेटवरील आणि अन्य आडमार्गावरील ढिलाईपणामुळे दोडामार्ग भागातून अनेकजण बेधडकपणे गोव्यात प्रवेश करीत असल्याचे आढळून येत आहेत. चोरवाटा किंवा आडमार्गाने होणाऱ्या रहदारीकडे कोणाचेच नियंत्रण नसल्याने या चोरवाटा महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश करण्यासाठी सुरक्षित ठरत आहेत.

चोरवाटांचे काय..?

दोडामार्ग तालुका हा डिचोली भागाला जोडला असून, सीमेवरून डिचोलीत प्रवेश करण्यासाठी खरपाल, म्हावळींगे, कुडचिरे आदी भागातून अनेक आडमार्ग किंवा चोरवाटा आहेत. याच चोरवाटांचा अवलंब करीत अनेकजण सीमांतर करून डिचोलीच्या दिशेने प्रवेश करतात. महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यातील माटणे, आंबडगाव, वजरे, आयी, तळेखोल आदी भागातील अनेकजण डिचोली शहरासह बार्देश भागात औद्योगिक प्रकल्प, हॉटेल आदी आस्थापनांनी काम करतात. या कामगारवर्गा बरोबरच धंद्यानिमित्त काहीजणांची डिचोली शहरासह बार्देश तालुक्याच्या दिशेने नियमित कूच असते. दोडामार्ग भागातून कामधंद्यानिमित्त नियमितपणे डिचोली शहरात येणाऱ्यांचा आकडा तीनशेहून अधिक असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे. म्हावळींगे जवळपासचे काहीजण तर पायपिट करीत सीमेवरून प्रवेश करीत असतात. नियमित लोकांसह अन्य काहीजणही सीमेवरून गोव्यात प्रवेश करतात.

बेधडक वाहतूक

म्हावळींगे येथील गेटजवळ सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असली, तरी त्याठिकाणी रॅपिड अँटीजेन चाचणीची सक्ती नाही. त्यामुळे या मार्गाने बेधडकपणे प्रवेश करणे सोपे होते. अनेकजणांची तर दुचाकी आदी वाहनांसह ये-जा सुरु असते. खरपाल येथून 'तिळारी' कालव्याच्या बाजूने एक कच्चा रस्ता आहे. हा रस्ता थेट दोडामार्ग रस्त्याला जोडलेला आहे. दोडामार्ग भागातून म्हापसा भागात जाणारे काहीजण दुचाकींसह याच रस्त्याने ये-जा करतात. मागील वर्षी टाळेबंदी काळात एप्रिल महिन्यात हा रस्ता अडविण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT