Goa: एकाच कुटूंबातील तीघांच्या संशयास्पद मृत्यूने राज्य हादरले!

तीघांच्या शवविच्छेदनानंतर मयताच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने पोलिसांचीही झोप उडाली.
पोलीस लाईन
पोलीस लाईनDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: चोरीच्या आरोपाखाली वेर्णा पोलिसांनी (Goa Police) केलेली बेदम मारहाण आणि सतावणुकीमुळे झुआरीनगर, सांकवाळ येथील एमईएस कॉलेजच्या परिसरात भाडेपट्टीवर राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांनी खोलीत गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी 9 वा. च्या सुमारास घडली. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या कर्तव्याबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. (Goa was shaken by the suspicious death of three members of the same family!)

हुलगप्पा अंबिगेरा (30), त्याची पत्नी देवम्मा अंबिगेरा (23) तसेच त्याचा भाऊ गंगाप्पा अंबिगेरा (25) अशी ही तिघे आहेत. शवविच्छेदनानंतर मयताच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने पोलिसांचीही झोप उडाली. मृतदेहांचा त्यांच्यासमक्ष पंचनामा करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. वेर्णा पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असली तरी ही आत्महत्या की हत्या, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे.

चोरीचा आरोप कुणावर व कशामुळे?

भाड्याच्या घराचे मालक शमसुद्दिन खान यांच्या घरामधून दागिने व डायमंड मिळून सुमारे 15 लाखांचा ऐवज लंपास झाला होता. चोरीच्या चार दिवसांपूर्वीच देवम्मा त्याच्याकडे घरकाम करीत होती. चोरीचा आळ शमसुद्दिन यांनी देवम्मा यांच्यावर घेतला होता. घरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी करताना दिसत असल्याचे सांगून शमसुद्दिन देवम्माला धमकी देत होता. चोरलेले दागिने परत कर किंवा 15 लाख रुपये आणून दे, असा तगादा लावत होता. मात्र त्याच्या या धमकीला घाबरत नसल्याने त्याने वेर्णा पोलिसात माहिती दिली होती. तक्रार दाखल न करताच पोलिसांनी हुलगप्पा, देवम्मा, गंगाप्पा तसेच प्रभू या यांना गेल्या आठवड्यापासून चौकशीसाठी आलटून पालटून बोलाविले. त्यांना मारहाण करून चोरीचा गुन्हा वदवून घेण्याचा प्रयत्न केला. प्रभू वगळता इतर तिघांना मारहाण केली. मारहाणीचे व्रण उठू नयेत म्हणून पोलिस पूर्ण ती सावधगिरी घेत होते. माझ्यासमक्ष ही मारहाण करण्यात येत होती, असे देवम्माचा भाऊ प्रभू तलवार याने ‘गोमन्तक’ला सांगितले.

पोलीस लाईन
Goa: पतीसोबत झालेल्या भांडणामुळे विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

वेर्णा पोलिसांचे अघोरी वर्तन

चोरी केल्याच्या संशयावरून वेर्णा पोलिसांनी महिलेसह चौघांच्या कुटुंबाला सतत मारहाण केल्यामुळे अपमानित‌ झालेल्या संपूर्ण परिवारानेच आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. प्रगत गोव्यातील पोलिसांच्या या अघोरी वर्तनामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.

तिघेही होते तणावाखाली

वेर्णा पोलिसांनी चौकशीसाठी आज 29 जूनला सकाळी 9 वाजता येण्यासाठी फोन केला होता. त्यामुळे रात्रीपासून तिघेही तणावाखाली होते. मारहाणीला सामोरे जावे लागेल याची भीती त्यांच्या मनात होती. सकाळी नेहमीप्रमाणे सर्वजण उठले. देवम्मा, हुलगप्पा व गंगाप्पा हे खोलीत होते. काही वस्तू आणण्यासाठी सकाळी 8.30 च्या सुमारास मी दुकानात गेलो. परत आलो असता तिघेही खोलीत ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले.

हे कुटुंब दहा वर्षांपासून गोव्यात

बिजापूर - कर्नाटक येथील अंबिगेरा हे कुटुंब हे कामानिमित्त गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ गोव्यात आहे. सांकवाळ येथे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ शमसुद्दिन खान यांच्या भाड्याचा घरामध्ये राहत आहेत. हुलगप्पा व गंगाप्पा हे दोघे मजुरी करीत असत. या भाडेपट्टीच्या खोलीत हुलगप्पा व देवम्मा हे जोडपे, तसेच हुलगप्पाचा भाऊ गंगाप्पा राहत होते. 15 दिवसांपूर्वीच हे कुटुंब गावाहून सांकवाळ येथे परतले होते व त्यांच्यासोबत देवम्मा हिचा भाऊ प्रभू तलवार आला होता. ते सर्वजण एकाच खोलीमध्ये राहात होते. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या दहशतीमुळे व मारहाणीमुळे अंबिगेरा कुटुंब कोलमडून गेले होते. गोव्यातून न जाण्याची वेर्णा पोलिसांनी धमकी दिली होती.

मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांचा नकार का?

वेर्णा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तिघांचे मृतदेह गोमेकॉ इस्पितळात शवविच्छेदनसाठी आणले. त्या मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांच्या सह्या घेतल्या. मात्र मृतदेहाचा पंचनामा करताना या नातेवाईकांना समोर घेतले नाही. डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालात मृतदेहाच्या शरीरावर जखमांच्या कसल्याच खुणा व व्रण नसल्याचे नमूद केले आहे. मृतदेहाचा पंचनामा समोर न केल्याने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. हा पंचनामा पुन्हा समोर करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. त्यामुळे हे मृतदेह पुन्हा शवागारात ठेवण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com