Banastarim Bridge Accident, Mardol police station Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: दिवाडी बेट अजूनही धुमसतेच आहे..!

न्याय मिळेपर्यंत स्वस्थ न बसण्याचा लोकांचा निर्धार

दैनिक गोमंतक

Banastarim Bridge Accident: दिवाडी बेटावरील शांत सुस्वभावी फडते दांपत्याचा एका मद्यपी कुटुंबामुळे बाणस्तारी अपघातात बळी गेल्याने संतप्त झालेल्या दिवाडीवासीयांचा राग अजून शांत झालेला नाही. येथील लोकांत अजूनही रागाची धग कायम असून जोपर्यंत बळी गेलेल्या योग्य न्याय मिळत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार येथील लोकांनी केला आहे.

बाणस्तारी अपघाताला कारणीभूत मद्यपी सावर्डेकर दांपत्याच्या घोर चुकीमुळे दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यात दिवाडी येथील सुरेश फडते व भावना फडते या दांपत्याचा बळी गेल्याने त्यांची दोन्ही मुले सध्या पोरकी झाली आहेत.

आपल्या मुलांचे लग्न करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या या दांपत्याची इच्छा तशीच राहिली तर या अपघातातील अन्य एक बळी गेलेला युवक अरुप कर्माकर याचे लग्न ठरले असतानाच त्याचे अपघाती निधन झाले.

अरूप कर्माकर हा मूळचा पश्‍चिम बंगालचा पण त्याचे आई वडील गेली अनेक वर्षे गोव्यात सुरवातीला बांदोडा येथे त्यानंतर त्याचा भाऊ व इतर कुटुंब फातोर्डा येथे वास्तव्यास गेले. तर अरूप कर्माकर हा फोंड्यात वास्तव्यास आला होता. त्याचे लग्नही ठरले होते, पण लग्न होण्यापूर्वीच त्याचा अपघातात बळी गेला.

अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी परेश सावर्डेकर याला अटक केली असली तरी त्याची पत्नी मेघना ही गाडी चालवत होती, असा कयास व्यक्त करण्यात येत असतानाच दिवाडीवासीयांनी म्हार्दोळ पोलिस स्थानकासमोर मोठे आंदोलन केले होते.

न्यायालयीन लढ्याचाच पर्याय !

संशयित मेघना हिला पोलिस स्थानकात आणा, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. मात्र पोलिसांनी लोकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत मेघनाला जामीन मिळवून देण्यासाठी परस्पर सहकार्य केले, असा आरोप आता लोकांकडून होत आहे. एकापरीने आता न्यायालयीन लढाई लढण्याशिवाय पर्याय नाही, असे मत दिवाडीवासीयांचे बनले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT