Jit Arolkar Dainik Gomantak
गोवा

MLA Jeet Arolkar: जमीन रूपांतरणाविरोधात पेडणेकरांचा एल्गार

MLA Jeet Arolkar: मसुदा मागे घ्या : अन्यथा ‘रास्ता रोको’: जीत

दैनिक गोमन्तक

MLA Jeet Arolkar: पेडणे तालुक्यासाठी प्रादेशिक विकास आराखडा असताना जमीन रूपांतर आराखडा का असा प्रश्न करत हा आराखडा मागे घ्यावा यासाठी आमदार जीत आरोलकर यांच्या नेतृत्वाखाली पेडणे विकास अभियानाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

सोमवारपर्यंत हा मसुदा मागे न घेतल्यास संपूर्ण तालुक्यात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले जाईल, असा यावेळी देण्यात आला.

आमदार आरोलकर यांनी स्थानिक पंचायतींच्या सरपंचांसह शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मंत्रालयात भेट घेऊन हा आराखडा रद्द करण्याची मागणी केली. यावेळी आरोलकर म्हणाले जमीन रुपांतरणाचा आराखडा करताना स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच पंचायतींना विश्वासात घेणे आवश्यक होते.

मात्र, याबाबत तसे झालेले नाही. आम्हालाही विकास हवा आहे. मात्र, तो करताना स्थानिकांना विश्वासात घ्यायला हवे. आराखडा बनवताना सार्वजनिक वापरावयाच्या जागा, मच्छीमार, धार्मिक स्थळे, स्मशानभूमी असे विविध झोन करणे आवश्यक आहे. मात्र, याचा विचार न करताच आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सोमवारपर्यंत मंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे. मात्र हा मसुदा मागे न घेतल्यास मंगळवारनंतर आम्ही ‘पेडणे बचाव अभियान’ सुरू करणार आहोत, असे आरोलकर म्हणाले.

चर्चा करून निर्णय : सावंत

या जमीन रूपांतर आराखड्याबाबत नगरनियोजन मंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो लोकहिताचा निर्णय घेतला जाईल. या आराखड्याचा मसुदा जाहीर झाला आहे. त्याला आक्षेप नोंदवता येतात आणि सूचना मांडता येतात. त्यांनी त्या मांडाव्यात. हा मसुदा पेडणे तालुक्यातील पंचायतींत उपलब्ध करून देण्यास नगर नियोजन मंत्र्यांना सांगितले आहे. सर्वांचा विचार करून निर्णय घेवू, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT