Panjim Parking: पणजीत पार्किंग घोटाळा; वाहनधारकांची लूट सुरूच

Panjim Parking: बैठकीत पडसाद शक्य : कंत्राट संपले तरी शुल्क आकारणी
Panjim Parking
Panjim ParkingDainik Gomantak

Panjim Parking: पणजी यापूर्वी येथे गाजलेल्या पे पार्किंग घोटाळ्याच्या स्मृती ताज्या करणारा प्रकार सध्या सुरु आहे. महापालिका क्षेत्रात पे पार्किंग शुल्क आकारण्याचे कंत्राट संपले असतानाही शुल्क आकारले जात आहे. शुक्रवारी असे शुल्क आकारणारे कंत्राटदाराचे कर्मचारी गोमन्तकच्या छायाचित्रकाराच्या कॅमेऱ्यात टिपले गेले.

Panjim Parking
Goa Shack: नव्या धोरणानुसार शॅक परवाने मंगळवार नंतर मिळणार

महापालिकेने दिलेले पे पार्किंगचे कंत्राट गेल्या महिन्यात संपले आहे. कंत्राटावर निर्णय घेण्यासाठी येत्या सोमवारी महापालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. असे असताना गेले महिनाभर अवैध पद्धतीने पे पार्किंग शुल्क आकारणी सुरुच आहे. शुल्क आकारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आता लक्ष केवळ चार चाकी गाड्यांकडे वळविले आहे.

स्थानिक आणि नियमित पणजीत येणारे दुचाकी वापरतात. त्यांना कंत्राटाची मुदत संपली आहे याची माहिती आहे. त्यामुळे शुल्क गोळा करणारे कर्मचारी जवळ आले की, दुचाकीस्वारांकडून आता कसले पैसे मागता अशी तोंडावरच विचारणा केली जाऊ लागली होती.

त्यामुळे केवळ चारचाकी गाडीवाल्यांकडून हे शुल्क आकारण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. विशेष म्हणजे महापालिकेचे कर्मचारी, पदाधिकारी, आयुक्त, महापौर हे सगळे शहरातून ये जा करत असतानाही त्यांच्या लक्षात हा गैरप्रकार आलेला नाही. त्यामुळे दिवसाढवळ्या हे बेकायदा पद्धतीने शुल्क आकारले जात आहे.

घोटाळा का होऊ दिला जात आहे ?

म्हापसा पालिका क्षेत्रात असे कंत्राट संपले तेव्हा म्हापसा पालिकेने नवा कंत्राटदार नेमेपर्यंत पालिकेचे कर्मचारी शुल्क आकारणीसाठी तैनात केले होते. तशी पद्धत अवलंबणे पणजी महापालिकेला शक्य असतानाही हा घोटाळा का होऊ दिला जात आहे याची चर्चा शहरात आता मूळ धरू लागली आहे. याचे पडसाद सोमवारी होणाऱ्या सभेत उमटणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com