Replacement of sign Board | Pedne Taluka Indian National Highway News  Dainik Gomantak
गोवा

पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग फलक चुकीचे

राष्ट्रीय महामार्गावर कारनामे: पेडणे तालुक्यातील फलक बदलण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

मोरजी: पेडणे तालुक्यातील धारगळ ते पत्रादेवी या राष्ट्रीय महामार्ग 66 लगत आणि जंक्शनवर जे फलक लावले आहेत त्यावरील गावांच्या नावांचे अक्षरश: धिंडवडे काढले आहेत. गावांच्या नावांची मोडतोड केलेले फलक त्वरित दुरुस्त करावेत, अशी मागणी पेडणे तालुका विकास समितीने केली आहे. ( Pedne National Highway sign boards wrong; Demand for replacement of board sign )

राष्ट्रीय महामार्गावर पत्रादेवी याठिकाणी एक फलक लावलेला आहे. तेथे ‘तांबोसे’ गावाचा उल्लेख ‘तैंम्बोक्सेग’ असा केला आहे. पत्रादेवी या ठिकाणी एक गाव आहे गाळेल. मराठीमध्ये त्याचा उल्लेख ‘गेलेले’ असा केला आहे. पत्रादेवी या ठिकाणी पेट्रोल पंपजवळ एक फलक आहे. तेथे ‘न्हयबाग’च्या ऐवजी ‘नायबाग’ आणि ‘कडशी’च्या ठिकाणी ‘कदिशी’ असा उल्लेख आहे. हे फलक दुरुस्त करावेत, अशी मागणी पेडणे तालुका विकास समितीचे अध्यक्ष व्यंकटेश नाईक (Venkatesh Naik), उमेश गाड, साईनाथ देसाई यांनी केली आहे. ( Indian National Highway News )

राष्ट्रीय महामार्ग विभागाला गावांची नावे व्यवस्थित लिहिता येत नसतील तर त्यांनी स्थानिकांकडे किंवा पंचायत सदस्यांशी संपर्क साधून योग्य नाव लिहिण्यासाठी मार्गदर्शन घ्यावे. हे चुकीचे फलक त्वरित काढून त्या ठिकाणी सुधारित नावांसह नवीन फलक लावावेत. - उमेश गाड.

पोर्तुगीज गोव्यातून जाऊन साठ वर्षे उलटली तरी अजूनही त्यांचे अस्तित्व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अबाधित का ठेवते? आजही अनेक गावांच्या नावाच्या शेवटी इंग्रजी ‘एम’ अक्षर जोडले जाते. ते त्वरित हटवून स्पष्ट गावांचा उल्लेख करावा. पेडणे असेल तर तिथे ‘पेरनेम’ लिहू नका. पणजी असेल तर ‘पंजिम’ लिहू नका. - साईनाथ देसाई.

- गावांची बदनामी थांबवा!

याविषयी महादेव गवंडी म्हणाले, अशा प्रकारचे चुकीचे फलक लावल्यामुळे गावांची बदनामी होतेच, शिवाय बाहेरून जी व्यक्ती नियोजित स्थळी जाण्यासाठी येते, त्यावेळी त्यांची दिशाभूल होऊ शकते. राष्ट्रीय महामार्ग विभागाने गावांची नावे स्थानिक नागरिकांना विचारून ती मराठीत व्यवस्थित लिहिली असती तर ही वेळ आली नसती. याची पुनरावृत्ती टाळावी, अशी मागणी महादेव गवंडी यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT