Truck Accident Dainik Gomantak
गोवा

मेरशीत ट्रकच्या धडकेत पादचारी ठार

अपघातानंतर ट्रक घेऊन पसार झालेल्या चालक धुळाप्पा पुजारी याला जुने गोवे पोलिसांनी त्याचा शोध घेऊन मेरशी सर्कल येथे अटक केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: मेरशी येथील हॉलिडे इन गेस्ट हाऊसजवळ पादचारी शंकर सिंग (३३ वर्षे) याला ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक घेऊन पसार झालेल्या चालक धुळाप्पा पुजारी याला जुने गोवे पोलिसांनी त्याचा शोध घेऊन मेरशी सर्कल येथे अटक केली.

(Pedestrian killed in truck collision in merces)

ही घटना आज (गुरूवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पादचारी शंकर सिंग हा मेरशीच्या दिशेने जात होता.मागून भरधाव आलेल्या ट्रकने पादचाऱ्याला धडक दिल्याने तो फेकला गेला.

डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर रहदारी नव्हती त्याचा फायदा घेत चालकाने ट्रक न थांबवता भीतीने तेथून पळ काढला. एका व्यक्तीने या ट्रकचा क्रमांक टिपून तो पोलिसांना दिला होता. या क्रमाकांच्या आधारे पोलिसांनी ट्रकचा शोध घेऊन चार तासात छडा लावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकन टॅरिफ अन् इराण युद्धानं जपानचं मोडलं कंबरडं, 1 लाख कोटींच्या व्यापार तुटीनं हादरलं टोकियो; ऑटोमोबाईल क्षेत्राला धक्का

Gajlakshmi Rajyog Benefits: पैशांचा पाऊस अन् भाग्याची साथ! 14 मे ला शुक्र-गुरुच्या युतीनं बनणार 'गजकेसरी राजयोग'; बँक बॅलन्समध्ये होणार दुपटीनं वाढ

गोव्यात पुन्हा भाषावादाचा 'वणवा' पेटणार? 1986 च्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे! मराठी राजभाषेच्या मागणीसाठी 'एल्गार'

IPL 2026 Points Table: पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची 'सुपरफास्ट' एक्सप्रेस! राजस्थान रॉयल्सला पछाडत गाठला तिसरा नंबर; 'ऑरेंज आर्मी' जोमात

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचा 'फायनल कॉल'! 30 एप्रिलपर्यंत मेमोरँडम सादर करण्याची संधी; वेतन-भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 'लास्ट चान्स'

SCROLL FOR NEXT