Sugarcane Dainik Gomantak
गोवा

Goa Farmer: ऊस उत्पादकांची रक्कम त्वरित द्या!

Goa Farmer: शेतकऱ्यांची मागणी : ‘संजीवनी’बाबत यंदाही साशंकता; इथेनॉल प्रकल्प कोणासाठी?

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Farmer: शेतकऱ्यांनी नव्या ऊस तोडणीला प्रारंभ केला असून तोडला जाणारा ऊस ठेकेदाराकरवी परराज्यात पाठविला जात आहे. असे असताना सरकारने गेल्या वर्षीची ऊस रक्कम प्रतिमेट्रिक टन रु. 560/-अद्याप चुकती न केल्यामुळे आधीच शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे ही रक्कम लवकर परत मिळावी अशी मागणी होत आहे.

सरकार शिल्लक रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. 80% रक्कम सहा महिन्यांपूर्वी देण्यात आली होती; पण शिल्लक 20% रक्कम देण्यात आलेली नाही. यंदाही संजीवनी साखर कारखाना सुरू होण्याच्या हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

सांगेतील प्रगतशील ऊस उत्पादक संजय कुर्डीकर म्हणाले, सरकार आता तीन वर्षांनंतर साखर कारखाना बंद करून इथेनॉल उत्पादन घेऊ पाहात आहे. आज संजीवनीच्या प्रशासकीय कारभाराला कंटाळून अनेक शेतकरी ऊस उत्पादनापासून लांब गेले. आता कितीही प्रयत्न केले तरी ऊस उत्पादन कमी पडणार असून इथेनॉल उत्पादन हे गोव्यातील शेतकऱ्यांसाठी नसून पर राज्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरेल.

आवश्‍यक गोष्टींची पडताळणी करा

सरकारने आता शेतकऱ्यांची बैठक घेऊन इथेनॉल उत्पादन घेण्यासाठी ऊस पिकाची किती आवश्यकता आहे आणि परत ऊस उत्पादन घेण्याची किती शेतकऱ्यांची मानसिकता आहे याची पडताळणी करावी. जेणेकरून पुढील हंगामात ऊस लागवड करण्यासाठी शेतकरी आतापासून तयारी करू शकतील, असे कुर्डीकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘मी पत्रकार असतो तर ...’ सरदेसाईंच्या मिश्किल प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा; Watch Video

Mohammed Siraj: 'मी बोल्ड करतो, तेंव्हाच सेलिब्रेशन करतो'! टीका करणाऱ्या इंग्लंडच्या चाहत्यांवर सिराजचा बाऊन्सर

Rainforest Challenge 2025: खडकाळ वाटा, पाणथळ रस्ता आणि 'रेनफॉरेस्ट चॅलेंज'चा थरार..

America Arms Supply: अमेरिकेने दिली पाकला शस्त्रे! भारताची आक्रमक भूमिका; 1971 ची बातमी केली Twit

Goa Assembly Live: रंगमंच कलाकार, उद्योजक परेश जोशी यांचे निधन

SCROLL FOR NEXT