Workers Death in Goa
Workers Death in GoaDainik Gomantak

Workers Death in Goa : बेतोड्यात खुल्या चेंबरमध्ये पडून कामगाराचा मृत्यू

मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दोन दिवसांपूर्वीच या चेंबरचं उद्घाटन केलं होतं.
Published on

Workers Death in Goa : बेतोड्यात खुल्या चेंबरमध्ये पडून कामगाराचा मृत्यू झाला आहे. बेतोडा जंक्शनवर असलेल्या या चेंबरमध्ये कामगार पडल्यानंतर तो पाण्यात बुडाला. या चेंबरचं झाकण उघडं असल्याने कामगाराला नाहक आपला जीव गमावावा लागला आहे. मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दोन दिवसांपूर्वीच या चेंबरचं उद्घाटन केलं होतं. स्थानिकांनी प्रशासनाला अशाप्रकारे चेंबर खुलं ठेवण्याला जबाबदार धरलं आहे.

याच भागात आणखीही खुली चेंबर असून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हलगर्जीपणामुळे एका कामगाराचा नाहक बळी गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संबंधित अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. बेतोडा भागात रस्त्याशेजारी काही ठिकाणी पाणीपुरवठा विभागाकडून चेंबरचं बांधकाम करण्यात आलं आहे. मात्र ते खुलं ठेवल्यामुळे वाहनचालकांसाठी धोका निर्माण झाला आहे.

Workers Death in Goa
Bike Rider Killed In Accident: कुर्टी येथे भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

दरम्यान आज आणखी एका घटनेत दुचाकीस्वाराची दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुर्टी फोंडा येथे महामार्गावर ट्रक आणि दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीत मृत्यू झाला. अशोक श्याम नाईक (वय 47) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

अशोक नाईक हे मूळचे बागवाडा, खांडेपार येथील रहिवाशी होते. ते काही कामानिमित्त दुचाकीवरून बाहेर पडले असता महामार्गावर आमिगोज जंक्शन येथे अचानक समोरून आलेल्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकी थेट ट्रकच्या चाकात आली. यात दुचाकीस्वार अशोक नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक काही अंतर डिव्हायडरवही चढला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com