Patto Bridge Security Dainik Gomantak
गोवा

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Patto Bridge security issues: पणजीतील पाटो (सेसा घर) ते रुआ द ऑरेम दरम्यानच्या पदपथ व पादचारी पुलावरील सुरक्षेच्या अभावाची गंभीर दखल गोवा मानवाधिकार आयोगाने घेतली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पणजीतील पाटो (सेसा घर) ते रुआ द ऑरेम दरम्यानच्या पदपथ व पादचारी पुलावरील सुरक्षेच्या अभावाची गंभीर दखल गोवा मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. या मार्गावर तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, पथदिवे सुरू करावेत आणि २४ तास पोलिस गस्त ठेवावी, असे निर्देश आयोगाने संबंधित विभागांना दिले आहेत.

आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती भारत देशपांडे, सदस्य डेस्मंड डिकॉस्टा आणि प्रमोद कामत यांच्या खंडपीठाने चौकशी अहवालात या सूचना केल्या आहेत. पणजीतील रहिवासी निवेदिता आर. यांनी २० जुलै २०२६ रोजी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आयोगाने ही कारवाई केली.

इमेजिन पणजी स्मार्ट सिटी मिशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांनी पाटो ते रुआ द ऑरेम मार्गावर तातडीने सीसीटीव्ही सुरक्षा कॅमेरे बसवावेत, तर वीज खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी पादचारी पूल आणि मार्गावरील पथदिवे सुरू करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

सीसीटीव्ही व पथदिव्यांच्या अभावामुळे हा परिसर ‘ब्लाइंड स्पॉट’ बनला आहे. येथे विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याचे नमूद करण्यात आले असून, यासंदर्भात एफआयआरही नोंदवण्यात आले आहेत.

महिला, बालके आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला यामुळे धोका निर्माण झाला असल्याचे आयोगाने निरीक्षण नोंदवले. संबंधित विभागांनी २७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत केलेल्या किंवा प्रस्तावित कारवाईचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT