

पणजी: मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला आहे; परंतु नावनोंदणी व इतर सर्व प्रक्रिया ही निवडणूक आयोगाकडून करण्यात येते आणि ती पारदर्शकपणेच पार पडली पाहिजे. ज्या गोमंतकीयांची नावे वगळली आहेत, त्रुटी आहेत, त्या दूर व्हायला हव्यात; परंतु बोगस मतदार भरणा होऊ देता कामा नये. विरोधक गोंयकारपण, अस्मितेची भाषा करतात आणि बोगस मतदारांची नावे जोडण्याला प्रोत्साहन देण्याचा प्रकार करत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. ते भाजप कार्यालयात माध्यमांशी बोलत होते.
नाईक म्हणाले की, अनेक असेही मतदार आढळून येतात की जे गोव्यात आणि कर्नाटकात दोन्हीकडे मतदान करतात. अशा गोष्टींवर आळा बसणे गरजेचे आहे.
असे प्रकार घडू नयेत. राज्यातील मतदान यादीत काही जर चुकीचे होत असेल तर निवडणूक आयोगाचे जे ‘बीएलओ’ आहेत व पक्षांचे ‘बीएलए’ आहेत ते गप्प राहतील का? कोण कोठे राहतो याची माहिती त्यांच्याकडे असते, त्यामुळे विरोधकांनी आताच आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडण्यास सुरू केल्याचे जाणवत आहे.
दरम्यान, बी.एल. संतोष यांची गुरुवारी दिल्लीत जाऊन भेट घेतली, त्यावेळी भाजप संघटनासंदर्भातील अहवाल, निवडणुकीसंदर्भातील चर्चा आणि सेवा संकल्प अभियान कार्यक्रम तसेच इतर विषयांवर चर्चा करण्यात आली असल्याचे दामू नाईक यांनी सांगितले.
भाजप संघटना मजबूत
निवडणूक जवळ आली व यात्रा काढली म्हणजे होत नाही. सातत्याने जनतेसोबत राहावे लागते. भाजप विविध अभियानांच्या माध्यमातून सतत जनतेसोबत असतो. भाजप संघटना मजबूत आहे, त्यामुळे कॉंग्रेसच्या यात्रेचा काही प्रभाव पडणार नाही. कॉंग्रेस यात्रेतून सरकारवर आरोप करत आहे; परंतु कॉंग्रेसने जे घोटाळे केले आहेत ते जनतेला पुन्हा एकदा आम्हाला सांगावे लागतील, असे नाईक यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.