tigar: Tilari protected forest in maharashtra Dainik Gomantak
गोवा

'पट्टेरी वाघ' तिलारी संरक्षक क्षेत्रातीलच; संशोधकाचा दावा

दैनिक गोमन्तक

पर्ये: म्हादई अभयारण्य क्षेत्राच्या सुर्ला भागात ( surla village of mhadei wildlife sanctuary) 30 जून रोजी गोवा वनखात्याच्या कॅमेरा ट्रपमध्ये छायांकित झालेली पट्टेरी वाघ हा तिलारी संरक्षित वनक्षेत्रातील ( Tilari protected forest in maharashtra ) असल्याचा निष्कर्ष वन्यजीव संशोधक गिरीष पंजाबी यांनी केला आहे.

गोवा वन खात्याने 30 जून रोजी कॅमेरा ट्रपमध्ये छायांकित केलेले वाघिणीचे छायाचित्र सोशल मीडियावरून प्रसारित केले होते. त्या चित्राची पडताळणी गिरीष पंजाबी केली असता सदर त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. गिरीष पंजाबी हे गेल्या दशक भरापासून सह्याद्री व्याघ्र अधिवसावर अभ्यास करीत असून ' वाइल्डलाईफ कंझर्वेशन ट्रस्ट (wildlife conservation trust) चे वन्यजीव संशोधक आहेत.

तसेच त्यांनी चिपळूण( chiplun ) येथील सह्याद्री निसर्ग मित्र संस्था ( sahyadri nisarg mitra ) आणि मुंबईतील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी( bombay natural history society ) यांच्या संयुक्त विद्यमाने 'ई मॅमल्स'( e- mammals) या प्रकल्पाअंतर्गत तिलारी संरक्षित वनक्षेत्रात क्षेत्रात मार्च 2018 मध्ये कॅमेरा ट्रप बसवलेले होते. त्यावेळी त्यांना एक वाघीण आढळलेली होती.

जेव्हा सुर्लात आढळलेल्या वाघीणीची चित्रे आणि तिलारीची चित्रे जुळवाजुळवणी केल्यानंतर त्यांच्यामध्ये साम्य असल्याचे समोर आले आणि हा निष्कर्ष काढला. दरम्यान या दोन्ही चित्रातील वाघांच्या पट्ट्याची रचना समान असल्याचे आढळून आले आहे. सुर्लातील वाघीण ही तिराळीहून स्थलांतरित झाल्याचे गिरीष पंजाबी यांनी स्पष्ट केले.

तिलारीतून वाघिणीची म्हादईत स्थलांतर

दरम्यान चार वर्षांपूर्वी तिलारी संरक्षित वनक्षेत्रात आढळलेल्या वाघिणीनी आपले बस्तान आता म्हादई अभयारण्य क्षेत्रात हलवले आहे. मार्च 2018 मध्ये तिलारी आणि त्यानंतर 27 मे 2018 मध्ये त्याच वाघिणीचा संचार चोर्ला जंगल क्षेत्रात झाला होता. चोर्लातही( chorla village in karnataka) तिचे चित्रे छायांकित झाली होती. तर आता हा संचार म्हादईत आढळला आहे. त्यामुळे तिने स्थलांतर केल्याचे स्पष्ट होते. तसेच तिलारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 2018 मध्ये कॅमेरा ट्रप मध्ये एक वाघ आढळलेला होता नंतर तो वाघ मे 2020 मध्ये काली व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळला गेला. तेव्हा या वाघाने 215 कि मी चे अंतर स्थलांतर केले होते. त्यामुळे या वाघांचे स्थलांतरही दिसून येते. अशा या दोन्ही उदाहरणातून पश्चिम घाटात व्याघ्र भ्रमण मार्गाचे महत्त्व ही लक्षात येते.

दरम्यान या वाघिणीबद्दल, गिरीश पंजाबी यांनी सांगितले की तिलारीत आढळलेल्या वाघिणीला आम्ही TT7 असे नाव दिले आहे. कॅमेरा ट्रप तंत्रामुळे सुर्लातील छायाचित्र हे तिलारीतील वाघिणीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिलारी वन क्षेत्र, म्हादई अभयारण्य व भिमगड अभयारण्य क्षेत्र जोडलेली क्षेत्रे असून या वाघांचा या परिसरात संचार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तिराळी मध्ये TT2 वाघीण आणि TT8 नर वाघ असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान या तिन्ही राज्यातील तिलारी वन संवर्धन क्षेत्र, म्हादई अभयारण्य व भीमगड अभयारण्य क्षेत्रात वाघांचा संचार असून ही क्षेत्रे एकमेकांना जोडलेली असल्याने वाघांच्या देखरेखीखाली आणि संरक्षणासाठी संयुक्त प्रयत्न करणार असल्याचे कोल्हापूर वनसंरक्षक डॉ. व्ही. बेन क्लमेट( dr. v. ben clemet, chief conservator of forest kolhapur ) यांनी सांगितले. तर गोवा वनखात्याच्या उपवनपाल ( वन्यजीव विभाग) जेबास्टिन अरुलराज ( jebestin arulraj , deputy conservator , wildlife division )यांनी म्हादईतील वाघांचे निरीक्षण करण्यासाठी आम्हाला विविध पावले उचलली असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT