Virat Kohli Gautam Gambhir Controversy: विराट-गंभीरमध्ये पुन्हा बिनसलं? ड्रेसिंग रुममधील 'तो' व्हिडिओ पाहून चाहते चक्रावले! Watch Video

Virat Kohli Gautam Gambhir: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Virat Kohli Gautam Gambhir Controversy
Virat Kohli Gautam Gambhir ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli Gautam Gambhir Controversy: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'किंग कोहली' गंभीरला जाणीवपूर्वक दुर्लक्षित करत आहे का? असे अनेक प्रश्न सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहेत. कोहली आणि गंभीर यांचे काही व्हिडिओ समोर आले, जे पाहून चाहत्यांना असे वाटते की, टीम इंडियाचा हा दिग्गज फलंदाज प्रशिक्षक गंभीरला टाळत आहे.

रांची येथे नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात कोहलीची बॅट जोरदार तळपली. त्याने 120 चेंडूंमध्ये 135 धावांची अविश्वसनीय सामना जिंकवून देणारी खेळी खेळली. याच खेळीदरम्यान आणि विजयानंतर घडलेल्या दोन घटनांमुळे या वादाच्या चर्चांना अधिक उधाण आले.

Virat Kohli Gautam Gambhir Controversy
Ind Vs SA ODI: KL राहुल की पंत, वॉशिंग्टन की नितीशकुमार? कोण खेळणार? रोहित, विराटच्या कामगिरीवर लक्ष

सोशल मीडियावर (Social Media) विराटचे दोन व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत, जे त्याच्या आणि गंभीरमधील वाढत्या तणावाकडे लक्ष वेधतात. पहिला व्हिडिओ ड्रेसिंग रुमच्या प्रवेशद्वाराजवळील आहे, जिथे गौतम गंभीर उभा आहे. विराट कोहली बाहेरुन येतो आणि ड्रेसिंग रुमचा दरवाजा उघडतो. कोहली आत येताच तो खिशातून फोन काढतो आणि बाजूला उभ्या असलेल्या गंभीरकडे न पाहता थेट पुढे निघून जातो. सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे, गंभीरची नजर विराटच्या दिशेने होती, तरीही विराटने त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही, ज्यामुळे चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

Virat Kohli Gautam Gambhir Controversy
IND VS SA Head to Head: 94 एकदिवसीय सामने... भारत- आफ्रिकामध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड-टू-हेडमध्ये कोणाची आकडेवारी भारी?

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, भारताच्या (India) विजयानंतर कर्णधार केएल राहुल आणि संघाचे इतर सदस्य हॉटेलमध्ये एकत्र येऊन केक कापताना दिसत आहेत. त्याचवेळी विराट कोहली आपली बॅग घेऊन तिथे येतो, पण तो थांबत नाही किंवा केक कटिंगमध्ये सामील होत नाही. तो थेट लिफ्टच्या दिशेने पुढे जातो. कोहलीच्या या दोन घटनांमधील वागणुकीमुळे चाहते असा कयास लावत आहेत की, त्याच्या आणि गौतम गंभीर याच्यामध्ये अजूनही सर्व काही ठीक नाहीये आणि दोघांमधील दुरावा वाढला आहे.

Virat Kohli Gautam Gambhir Controversy
IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

रांचीमध्ये कोहलीने रचला विश्वविक्रम

या सर्व वादाच्या चर्चा एका बाजूला असल्या तरी, फलंदाजीमध्ये विराटने रांचीमध्ये शतक झळकावून एक नवा इतिहास रचला. तो या तूफानी खेळीने विक्रमादित्य ठरला. कोहली आता एका फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके करणारा जगातील अव्वल फलंदाज बनला. विराटने वनडे क्रिकेटमध्ये आपले 52वे शतक पूर्ण केले. या विक्रमात कोहलीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला मागे सोडले. सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतके झळकावली.

Virat Kohli Gautam Gambhir Controversy
IND vs SA 2nd Test: गुवाहाटी कसोटीत षटकारांचा 'पाऊस'! मार्को यानसेनने रचला नवा इतिहास; दिग्गज व्ही व्ही रिचर्डसन यांचा मोडला 40 वर्षे जुना रेकॉर्ड VIDEO

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात कोहली सुरुवातीपासूनच उत्कृष्ट लयीत दिसला. विराटने आपले अर्धशतक 47 चेंडूंमध्ये पूर्ण केले. अर्धशतकानंतर त्याने आपला आक्रमक गिअर बदलला आणि 102 चेंडूंमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 83वे शतक पूर्ण केले. कोहलीने आपल्या शानदार खेळीदरम्यान 11 चौकार आणि 7 उत्तुंग षटकार लगावले, ज्यामुळे त्याने संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील तणावाचे प्रसंग राष्ट्रीय संघातही दिसत आहेत का, यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com