Dr. Shivanand Bandekar  Dainik Gomantak
गोवा

Doctor's Day 2024: सर्व रुग्णांना समान वागणूक मिळणार!

Goa Doctor's Day: मार्गदर्शक प्रणालीवर काम करत आहोत अशी माहिती डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सर्व रुग्णांना समान वागणूक मिळावी, अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही कामही सुरू केले आहे. उपचारांसाठी काहीवेळा वशिला लावण्‍याचा प्रयत्‍न केला जातो; डॉक्टरांवर दबाव आणण्यात येतो.

अशावेळी सर्वसामान्य रुग्णांवर अन्याय होऊ नये, यासाठी कटाक्षाने लक्ष ठेवावे लागते. काहीवेळा तर रुग्ण म्हणून आलेले डॉक्टरसुद्धा ‘वेटिंग’वरच असतात, ही बाब चिंतेची आहे. त्यामुळे सर्व रुग्णांना समान वागणूक मिळावी, असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही मार्गदर्शक प्रणाली तयार करत आहोत. लवकरच यासंबंधीचा निर्णय होईल, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.

डॉ. बांदेकर यांनी सुरवातीला गोमेकॉच्या स्थापनेपासूनच्या इतिहासाला उजाळा दिला. पोर्तुगीज विद्यापीठाच्या आधिपत्याखाली निर्माण झालेल्या या आशियातील पहिल्या इस्पितळाची तेव्हापासूनची आत्तापर्यंतची वाटचाल या अनुषंगाने अनेक पैलू डॉ. बांदेकर यांनी आपल्या वार्तालापात उलगडले.

गोमेकॉत शिकून तयार झालेले डॉक्टर देशातच नव्हे, तर परदेशातही सेवा देत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. गोमेकॉ ही संस्था विविध अत्याधुनिक सेवा पुरवीत नवनवे टप्पे पादाक्रांत करीत असल्याचे ते म्हणाले.

सुरवातीला दै. ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी प्रास्ताविकपर भाषणात डॉ. बांदेकर यांच्या आधिपत्याखाली गोमेकॉच्या होत असलेल्या वाटचालीवर प्रकाश टाकत, ‘डॉक्टर दिना’चे महत्त्व विषद केले. व्यवस्थापक विजू पिल्लई यांनी डॉ. बांदेकर यांचे स्वागत केले. ‘गोमन्तक टीव्ही’चे वृत्तसंपादक विश्‍वनाथ नेने यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांमुळे आरोग्य सेवेत गोवा देशात प्रथम

गोमेकॉमध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्याबरोबर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही सहकार्य केले आहे, त्यामुळेच आरोग्य सेवेत देशात गोमेकॉ पहिल्या क्रमांकावर आहे. परराज्यातील अनेक डॉक्टर गोमेकॉला भेट देतात, तेव्हा येथील सेवा पाहून थक्क होतात, असे डॉ. शिवानंद बांदेकर यांनी ठामपणे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

विकेट पडताच टीव्ही बंद करायचे, 'या' महान भारतीय क्रिकेटपटूला मुलगा मानायचे, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 'ती' खास पोस्ट चर्चेत!

Goa Politics: ''भाजपने यादी जाहीर केल्यावरच आम्ही उमेदवार देऊ!'', ZP Electionसाठी पाटकरांचा 'वेट ॲण्ड वॉच'चा फॉर्म्युला

SCROLL FOR NEXT