Aleixo Sequeira
Aleixo Sequeira Dainik Gomantak
गोवा

Aleixo Sequeira: पाद्री, विरोधकांकडून दिशाभूल! सिक्वेरा

गोमन्तक डिजिटल टीम

Aleixo Sequeira

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुवे मतदारसंघातील दोन शाळांना मान्यता दिली आहे. या दोन्ही शाळा पाद्रीतर्फे चालविल्या जातात. त्यामुळे भाजप हा धर्मांध पक्ष आहे असे म्हणणे व मानणे चुकीचे आहे.

पाद्री व विरोधक लोकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप नुवेचे आमदार तथा पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी केला.

नुवेत आयोजित कोपरा बैठकीत सिक्वेरा बोलत होते. यावेळी माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, स्थानिक पंच, माजी पंच उपस्थित होते.

इंडिया’ आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडीस व त्‍या पक्षांच्‍या इतर नेत्यांनी भाजपवर तसेच भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना सिक्वेरा म्‍हणाले, मीसुद्धा देवाला मानतो आणि चर्चमध्ये प्रार्थनासभेला जातो. लोकांची सेवा करणे हासुद्धा माझा एक धर्म आहे. त्‍यामुळे धर्माचा हिशोब कॅप्टन विरियातो यांनी मला देण्याची गरज नाही.

नुवे मतदारसंघातील गरीब व गरजू लोकांना घरबांधणीसाठी ७०० प्लॉट तयार केले जातील असे आश्‍‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. भाजपला आघाडी मिळाली तर मलाही नुवेतील लोकांचे प्रश्‍‍न मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यास व समस्या सोडविण्यास बळ मिळेल, असे सिक्वेरा म्‍हणाले. दरवर्षी शेती लागवडीसाठी शेतकऱ्यांना मी मदत करीत असतो. यंदाही शेतीसाठी सहकार्य करणार आहे. शिवाय बियाणे, खते देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

घर सांभाळून पल्लवी सासूची सेवासुद्धा करतात

महिला घर सांभाळतात. माझी बायकोही घर सांभाळते असे सांगून सिक्‍वेरा म्‍हणाले की, भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे या आठ शाळा चालवतात. कित्येक कंपन्यांमध्ये त्या प्रशासक आहेत.

उच्चशिक्षित असूनही त्‍या आपले घर, व्यवसाय, समाजसेवा सांभाळून सासूची सेवासुद्धा करतात. त्यामुळे त्‍या घर सांभाळत नाहीत अशी टीका करणे चुकीचे आहे. विरोधक त्‍यांच्‍यावर नाहक आरोप करत आहेत, कारण त्यांच्याकडे अन्य मुद्देच नाहीत, असा आरोपही सिक्वेरा यांनी केला.

मीसुद्धा देवाला मानतो आणि चर्चमध्ये प्रार्थनासभेला जातो. लोकांची सेवा करणे हासुद्धा माझा एक धर्म आहे. त्‍यामुळे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी धर्माचा हिशोब मला देण्याची गरज नाही.

- आलेक्‍स सिक्‍वेरा, पर्यावरणमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : अवाजवी शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्‍था निशाण्यावर; मुख्‍यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Panaji News : दहावी झाली, आता पुढे काय? स्मार्ट निर्णय घ्या; व्यावसायिक, औद्योगिक संस्थांचे पर्याय

PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

SCROLL FOR NEXT