Court Dainik Gomantak
गोवा

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

Pastor Dominique Dsouza: पास्टर डॉमनिक डिसोझा आणि त्यांची पत्नी जोन डिसोझा यांना उत्तर गोवा जिल्ह्यातून तडीपार करण्याचा उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Pastor Dominique Dsouza: पास्टर डॉमनिक डिसोझा आणि त्यांची पत्नी जोन डिसोझा यांना उत्तर गोवा जिल्ह्यातून तडीपार करण्याचा उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश होता. या आदेशाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात त्यांनी दाखल केली आहे. यापूर्वी २६ एप्रिलपर्यंत हे प्रकरण निकाली काढावे, असे निर्देश न्यायालयाने मुख्य सचिवांना दिले होते. या आव्हान याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

अलीकडेच, उत्तर गोव्याच्या (North Goa) जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी एक आदेश पारित केला होता ज्यामध्ये पास्टर डॉमनिक डिसोझा आणि जोअन मस्कारेन्हास या दोघांनाही सहा महिन्यांच्या कालावधीसाठी उत्तर गोव्याच्या अधिकारक्षेत्रातून तडीपार करण्यात आले होते. 

या तडीपारीच्या आदेशानुसार, सदर जोडप्याने दर महिन्याला एकदा जवळच्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला त्यांच्या राहण्याचे ठिकाण कळवणे आवश्यक होते. शिवाय जर त्यांना गोवा राज्य सोडायचे असेल तर त्यांनी ते गेल्यानंतर १० दिवसांच्या आत अधिकाऱ्यांना कळवायचे होते. आणि गोव्यात परतल्यावर दहा दिवसांच्या आत त्यांच्या आगमनाची माहिती जवळच्या पोलिस (Police) ठाण्यात देणे बंधनकारक होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Winter: धुक्यात हरवला गोवा! हुडहुडी वाढली; पुढचे 2 दिवस कसे राहणार हवामान? वाचा..

Goa Politics: खरी कुजबुज; मेस्सी गोव्यात आला असता तर !

Manik Elephant: 'माणिक हत्ती' 1200 किमी प्रवास करून 'वनतारा'त जाऊ शकेल का? गोवा खंडपीठाचे शारीरिक क्षमता तपासण्याचे आदेश Video

Goa ZP Election 2025: फोंडा तालुक्यातील कौल कोणाच्या बाजूने? भाजपची प्रतिष्ठा पणाला; विधानसभेची रंगीत तालीम

Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! 300 हून अधिक पोलिस तैनात; मतदारसंघांमध्ये चुरस

SCROLL FOR NEXT