Manik Elephant: 'माणिक हत्ती' 1200 किमी प्रवास करून 'वनतारा'त जाऊ शकेल का? गोवा खंडपीठाचे शारीरिक क्षमता तपासण्याचे आदेश Video

Manik elephant Goa: गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या ५९ वर्षीय ‘माणिक’ हत्तीला उपचारार्थ ‘वनतारा’ प्राणी बचाव केंद्रात हलवण्याचे निर्देश गोवा खंडपीठाने राज्य प्रशासनाला दिले आहेत.
Goa High Court elephant order
Manik elephant GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या ५९ वर्षीय ‘माणिक’ हत्तीला उपचारार्थ ‘वनतारा’ प्राणी बचाव केंद्रात हलवण्याचे निर्देश गोवा खंडपीठाने राज्य प्रशासनाला दिले आहेत. हा प्रवास सुमारे १२०० किलोमीटरचा असल्याने प्रवासासाठी हत्तीची शारीरिक क्षमता तपासल्यानंतरच त्याला नेण्याची परवानगी दिली जाईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची अत्यंत तातडीची परिस्थिती म्हणून दखल घेतली. या हत्तीला वाचवण्यासाठी त्याच्यावर गुजरातमध्ये उपचार होणे आवश्यक आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

‘माणिक’ हत्ती २००९ पासून कुळे येथील ‘जंगल बुक रिसॉर्ट’ मध्ये आहे. सध्या त्याला तीव्र संधिवाताचा त्रास होत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. राज्यातील उपलब्ध वैद्यकीय उपचार अपुरे पडत असल्याने रिसॉर्ट व्यवस्थापनाने त्याला तातडीने गुजरातला हलवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Goa High Court elephant order
माणिकला वाचविण्यासाठी तातडीने पाऊले उचला; 59 वर्षीय हत्तीला उपचारासाठी वनतारामध्ये हलवा, हायकोर्टाची गोवा सरकारला सूचना

‘वनतारा’मध्ये अत्याधुनिक सुविधा

रिलायन्स फाऊंडेशन संचालित जामनगर येथील ‘वनतारा’ मध्ये हत्तींसाठी खास ‘आयसीयू ॲम्ब्युलन्स’ उपलब्ध आहेत. यामध्ये एअर सस्पेन्शन, पॅडिंग आणि लिफ्टसारख्या सुविधा आहेत, ज्यामुळे आजारी हत्तीचा प्रवास सुकर होऊ शकतो.

न्यायालयाने निर्देश दिले की, गोव्याचे पशुसंवर्धन संचालकांनी त्यांच्या डॉक्टरांच्या पथकासह आणि वनतारा येथील तज्ञांशी चर्चा करून माणिक प्रवासासाठी फिट आहे की नाही, याचा निर्णय घ्यावा. जर संचालकांच्या मते हा प्रवास शक्य असेल, तर सुट्ट्यांचे कारण न देता संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ ट्रान्झिट पास जारी करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Goa High Court elephant order
Omkar Elephant: 'ओंकार' हत्ती अखेर पोहोचला कळपाजवळ, मोर्लेपर्यंत मजल; वनविभागाचे हालचालींकडे लक्ष

जुन्या आदेशांकडे लक्ष

सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या काही जुन्या आदेशांकडे लक्ष वेधले, ज्यामध्ये हत्तींच्या हस्तांतरणावर निर्बंध आहेत. मात्र, खंडपीठाने स्पष्ट केले की, सध्या मालकी हक्कापेक्षा ‘माणिक’चा जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे आहे. हत्ती बरा झाल्यानंतर त्याला पुन्हा गोव्यात परत आणले जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com