Goans Surrenders Indian Passport  Dainik Gomantak
गोवा

Passport Issue: पासपोर्टप्रश्‍नी फ्रान्‍सिस सार्दिन निष्‍क्रिय

Passport Issue: मुख्‍यमंत्री सावंत : आठ-दहा दिवसांत प्रश्‍‍न सोडविणार

दैनिक गोमन्तक

Passport Issue:

पोर्तुगीज पासपोर्टचा प्रश्र्न बहुत करून ख्रिस्ती लोकांना सतावत आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यातील नागरिकांना त्याची झळ सोसावी लागत आहे. पासपोर्टचा प्रश्र्न केंद्र सरकारने सोडवायला हवा. त्यासाठी लोकसभेत हा प्रश्र्न मांडायला हवा होता; पण दक्षिण गोव्याचे कॉंग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी या प्रश्र्नासंदर्भात काहीच हालचाल केली नाही.

त्यांना हा साधा प्रश्न लोकसभेत मांडला आला नाही, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी रात्री नुवेतील एका कार्यक्रमात केला.

राज्य सरकारने हा प्रश्र्न केंद्रापर्यंत पोहोचविला आहे. हा प्रश्र्न येत्या आठ-दहा दिवसांत सोडविला जाईल. मी आणि पर्यावरणमंत्री सिक्वेरा यांनी यासंदर्भात केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितली. या प्रश्र्नावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे केंद्रीय मंत्र्यांनी आम्हाला आश्र्वस्त केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यावरण मंत्री सिक्वेरा, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत तसेच माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते.

सावंत म्हणाले की, स्थानिक लोकांना धर्म व जातीवरून जे कोणी चिथावत आहेत, त्यांना बळी पडू नका. एसटी समाजाचा राजकीय आरक्षणाचा प्रश्र्नही केंद्र सरकारकडे मांडला असून हे आरक्षण २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रचाराचे रणशिंग फुंकले नुवेतून

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सासष्टी तालुक्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग नुवे मतदारसंघातून फुंकले. मुख्यमंत्री तसेच पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी नुवे येथील बहुसंख्य नागरिकांच्या भेटी घेतल्या.

भाजपचा दक्षिण गोव्यातील उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवतील. तो नक्कीच बलाढ्य उमेदवार असेल. सर्वांनी गावाच्या विकासासाठी भाजपला पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पाच हजार टाक्यांचे वितरण

नुवे मतदारसंघातील पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ५ हजार टाक्यांचे वितरण केले जाईल. सरकारने त्याला मंजुरी दिल्याचे पर्यावरणमंत्री सिक्वेरा यांनी सांगितले. शिवाय शेतकऱ्यांना शेतीसाठी विविध साधनसुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यांना सर्व प्रकारची खते, रोपटी पुरविली जातील, असेही सिक्वेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT