Bicholim Bus Stand Dainik Gomantak
गोवा

Bicholim: डिचोलीत खासगी प्रवासी बसगाड्या बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय

Bicholim News: विविध मार्गावर धावणाऱ्या बहुतेक खासगी प्रवासी बसगाड्या सोमवारी (ता.६) बंद राहिल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News: विविध मार्गावर धावणाऱ्या बहुतेक खासगी प्रवासी बसगाड्या सोमवारी (ता.६) बंद राहिल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. प्रवासी बसगाड्यांअभावी सायंकाळी डिचोलीत प्रवासी अडकून पडले. सकाळी ते दुपारपर्यंत डिचोली (Bicholim) बसस्थानकावर तर विविध ठिकाणी जाणारे प्रवासी बसच्या प्रतीक्षेत ताटकळत राहिल्याचे आढळून येत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, काही खासगी प्रवासी बसगाड्या निवडणूक प्रक्रियेसाठी वापरण्यात आल्याने सोमवारी बहुतेक खासगी प्रवासी बसगाड्या बंद होत्या. परिणामी बहुतेक बसगाड्यांची नियोजित मार्गावरील वाहतूक सेवा बंद होती.

बहुतेक खासगी प्रवासी बसगाड्या बंद राहिल्याने इच्छितस्थळी जाण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांची कुचंबणा झाली. बहुतेक प्रवासी अडकून पडले. ‘कदंब’च्या आणि मोजक्याच खासगी प्रवासी बसगाड्या धावताना दिसून येत होत्या. बऱ्याच वेळानंतर एखादी बसगाडी बसस्थानकावर येत होती. बसगाडी येताच बसमध्ये चढण्यासाठी गर्दी होत होती.

प्रवाशांना भुर्दंड

बहुतेक बसगाड्या बंद राहिल्याने अनेक प्रवासी अडकून पडले. असे एक प्रवासी आनंद गावकर यांनी सांगून, या गैरसोयीबद्धल तीव्र नाराजी व्यक्त केली. बसगाड्या बंद राहिल्याने काही प्रवाशांनी तर भाड्याची मोटरसायकल तसेच रिक्षा करून इच्छित स्थळ गाठले. त्यामुळे त्यांना अधिक पैसेही मोजावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Land Scam: मडगावात भूखंड देण्याच्या बहाण्याने 42.50 लाखांची फसवणूक; फातोर्डा येथील एकाविरोधात गुन्हा दाखल

कोंकणा सेन '7 वर्ष लहान' बॉयफ्रेंड सोबत गोव्यात, डेटिंगच्या चर्चांना उधाण; सोशल मीडियावर Photos Viral

Verna Accident: वेर्णा येथे चार वाहनांचा विचित्र अपघात; जिवितहानी टळली

Rama Kankonkar Assault: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर सहाजणांकडून जीवघेणा हल्ला; हल्लेखोर फरार

घटस्थापनेला नवनिर्वाचित समितीकडे पदभार, 'GCA'च्या नव्या पदाधिकाऱ्यांकडून विकासाची अपेक्षा

SCROLL FOR NEXT