Deadbody found in Arambol Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पुन्हा एक मृतदेह सापडला; संशयिताला बेड्या

हरमल परिसरातील गेस्ट हाऊसमध्ये महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत; घातपाताचा संशय

दैनिक गोमन्तक

पेडणे : गोव्यात आणखी एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. पेडणे तालुक्यातील हरमल परिसरात एका गेस्ट हाऊसमध्ये एका महिलेच्या मृतदेह सापडला असून याप्रकरणी पेडणे पोलिसांनी बांदा येथील एका संशयिताला अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मृत महिला सावंतवाडी भागातील असल्याचीही माहिती मिळाली आहे.

हरमल खालचावाडा परिसरातील एका गेस्ट हाऊसमध्ये सोमवारी सकाळी एका महिलेच्या मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. महिलेचा मृतदेह हा अर्धवट कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे महिलेचा मृतदेह नेमका कशामुळे झाला हे उत्तरीय तपासणीनंतर समजणार आहे. मात्र पोलिसांनी याप्रकरणी बांदा येथील एका व्यक्तीला हत्येच्या संशयातून अटक केली आहे.

मृत महिलेचं नाव श्रेया माडखोलकर असून सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास रुमबॉयला खोलीतून कुजल्याचा वास आला. याची माहिती रुमबॉयने लगेच मालकाला दिली. मालकाने पेडणे पोलिसांना पाचारण करुन खोली उघडली आणि त्याचठिकाणी जमिनीवर महिलेचा अर्धवट कुजलेला मृतदेह पोलिसांना आढळून आला. महिलेने उंदिर मारण्याचं औषध घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पेडणे पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह गोमेकॉच्या रुग्णालयात पाठवून दिला आहे. दरम्यान मृत महिला ही अटकेतील संशयिताच्या मित्राची पत्नी असल्याची माहिती आहे. तसंच प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याचा संशयही पोलिसांना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT