हल्लेखोरांना अटक करण्यात कळंगुट पोलिसांची दिरंगाई

साहनी सौदागर यांचा आरोप; कळंगुट पोलिसांची कारवाईत दिरंगाई
Calangute police delay in arresting assailants
Calangute police delay in arresting assailants Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कांदोळी येथे गँगस्टर्स टोळीकडून आपल्या मुलांवर हल्ला करण्यात आला. एका मुलाच्या डोक्यावर हॉकी स्टीक व बॅटने झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे तो रूग्णालयात बेशुद्धावस्थेत आहे. या घटनेप्रकरणी कळंगुट पोलिस स्थानकात तक्रार दिली त्याला आठवडा उलटून गेला, तरी कारवाईकडे चालढकलपणा सुरू आहे. मुख्य हल्लेखोर हा अजूनही कळंगुट भागात मोकाटपणे फिरत असून त्याला अटक केली जात नसल्याचा आरोप मुलाच्या आईने केला आहे. (Calangute police delay in arresting assailants)

यासंदर्भात अधिक माहिती देताना रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या अब्दुल याची आई साहिन सौदागर हिने सांगितले की 7 मे रोजी ही मारहाणीची घटना घडली होती. माझ्या निष्पाप तीन मुलांना एका गँगस्टर्स टोळीने मारहाण केली. या मारहाणीत आपला मुलगा अब्दुल याच्या डोक्याला बरेच टाके पडले असून त्याची जगण्याची शाश्‍वती डॉक्टरांनी दिलेली नाही. तो सध्या मृत्यूशी झुंज देत आहे, तर ज्याने मारहाण केली तो मात्र मोकाट आहे व पोलिस त्याला अटक करण्यासाठी कोणतीच ठोस पावले उचलत नाहीत.

Calangute police delay in arresting assailants
आसगावात कोट्यवधींच्या जमिनीचा गैरव्यवहार, कारवाईची मागणी

कांदोळी येथे एका क्लबमध्ये मी कामाला आहे. त्या 7 मे रोजी संध्याकाळी मी मालकाला भेटण्यास गेले होते. माझ्यासोबत माझी तीन मुलेही होती. त्या ठिकाणी पर्यटक व गाईड यांच्यामध्ये वाद सुरू होता. माझी मुले बाहेर उभी होती. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या एका तरुणाने माझ्या मुलांना हातानी मारहाण करण्यास सुरवात केली. त्यामुळे माझ्या एका मुलाने ही माहिती दिल्यावर मी तेथे गेले व मारहाणीचे कारण विचारले, तर त्या तरुणाने मलाही लाथाबुक्क्यांनी मारले. त्यानंतर हा तरुण इतरांना घेऊन आला. त्यावेळी त्यांच्याकडे हॉकी स्टीक व बॅट होती. या हॉकी स्टीकने अब्दुल याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने त्याच्या डोक्याला जबर जखम झाली, तर मी बेशुद्धावस्थेत तेथे कोसळले, अशी माहिती त्या महिलेने दिली.
या घटनेनंतर मला कळंगुट पोलिस स्थानकात आणले, त्यावेळी माझ्या सोबत मुले नव्हती.

जखमी अब्दुल याला गोमेकॉ रूग्णालयात नेले होते, तर हल्लेखोर इतर दोन मुलांचा पाठलाग करत होते. पोलिस स्थानकात मी दोनवेळा बेशुद्ध पडले. त्यानंतर शुद्धीवर आल्यावर तक्रार दिली. अब्दुल याला रूग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाल्यावर तेथे धाव घेतली असता तो बेशुद्धावस्थेत असून डॉक्टरांनी त्याची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले आहे. माझ्या मुलांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा अशी वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

हल्लेखोरांना अटक करण्याऐवजी आपल्या इतर दोन मुलांना अटक केली व त्यांना जामीन देऊन पोलिसांत हजेरी लावण्यास सांगितले जात आहे. स्थानिक आमदार मायकल लोबो यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनीही मदत करतो म्हणून सांगून अजून काहीच केले नाही. त्यामुळे या हल्लेखोरांच्या पाठिशी राजकारणी आहेत का असा संशय येतो, असे सौदागर यांनी सांगितले.

दोघांना अटक, एक फरारी

कळंगुट पोलिस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा हल्ला ‘गाईड’ करण्याच्या प्रश्‍नावरून झाला आहे. घटनेच्या पहिल्याच दिवशी हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे, तर ज्याने अब्दुल याच्यावर हल्ला केला तो अजूनही फरारी आहे व त्याचा शोध घेण्यात येत आहे. सौदागर हिच्या मुलांची त्याच दिवशी हल्लेखोरांबरोबर झालेल्या बाचाबाचीप्रकरणी तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे. या हल्ल्यातील मुख्य संशयिताचा शोध घेण्यात येऊन अटक केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com