Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; नरेंद्र मोदींचे कोकणी भाषण

Khari Kujbuj Political Satire: आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजनात यंदा अनेक त्रूटी पाहायला मिळाल्या. समारोहाच्या सोहळ्याला तर हद्दच झाली चक्क अर्धे स्टेडियम खाली होते.

गोमन्तक डिजिटल टीम

‘इफ्फी’त पंतप्रधान मोदींचा संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्धापनदिन सोहळ्यास आणि श्रीरामाच्या भव्य ७७ फूट उंचीच्या मूर्तीचे अनावरण करण्यासाठी काल गोव्यात उपस्थित होते. मात्र, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचा समारोपही कालच झाला. मात्र, गोव्यात असूनही इफ्फीच्या समारोप सोहळ्यास उपस्थित राहू शकत नसल्याचा संदेश पंतप्रधानांनी पाठवल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गज सिने अभिनेत्यांनी सिनेरसिकांपर्यंत पोहचवला. ∙∙∙

‘इफ्फी’चा रंग फिका

आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजनात यंदा अनेक त्रूटी पाहायला मिळाल्या. समारोहाच्या सोहळ्याला तर हद्दच झाली चक्क अर्धे स्टेडियम खाली होते. अनेकजण पास मिळावे कार्यक्रमस्थळी जाता यावे सुपरस्टार ‘थलैवा’ रजनीकांत यांची एक झलक पाहायला मिळावी यासाठी तळमळत होते परंतु अनेकजण निराश होऊन परतून गेले. आयोजनाचा बट्ट्याबोळ झाला होता. इफ्फी दरम्यानही यंदा अनेक त्रूटी होत्या. थिएटरमध्ये आसनव्यवस्था अर्धी रिकामी राहायची पंरतु एखादा सिनेचाहता प्रवेश द्यायची विनंती करत असेल तर प्रवेश नव्हता... एक ना हजार गोष्टी घडल्या. परंतु अनेकजण मूग गिळून बसले परंतु समारोपाच्या सोहळ्याला मात्र हद्दच झाली. इफ्फीचा रंग फिका पडला. ∙∙∙

स्वामींच्या आग्रहास्तव मोदी करणार एकादशी

पर्तगाळ येथे काल झालेला श्रीराम मूर्तीचा अनावरण सोहळा हा आकर्षक होताच. पण त्याही पेक्षा भाविकाना अधिक आकर्षित जर कुणी केले असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्तगाळ स्वामी श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामीजींच्या भाषणांनी, यावेळी बोलताना स्वामीजींनी मोदी हे नवरात्र आणि चातुर्मास व्रताचे निष्ठेने पालन करतात, असे सांगून त्यांनी आता एकादशी व्रतही पाळावे, अशी आग्रहाची विनंती केली. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात त्यांना उत्तर देताना आपण यापुढे एकादशी व्रतही पाळू असा निर्वाळा दिला. आणि भाविकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ∙∙∙

मुख्यमंत्र्यांचे कोकणी भाषण

कालच्या पर्तगाळ येथील समारंभाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित असल्याने बहुतेक वक्त्यांनी आपली भाषणे हिंदीतून केली. अपवाद होता तो फक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा. प्रधानमंत्री स्वतः व्यासपीठावर असतानाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संपूर्ण भाषण कोकणीतून केले. स्वतः नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या भाषणाची सुरुवात कोकणीतूनच करत उपस्थितांची मने जिंकली. ∙∙∙

पुन्हा गोळीबार!

गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास पडोसे सत्तरीत भर वस्तीत गोळीबार झाला. त्यामागचेकारण गुलदस्त्यात आहे. याआधी उगवे परिसरात गोळीबार झाला होता. शिवाय अशा प्रकारे वारंवार गोळीबार होत असल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून कारवाईबाबतच्या उदासीनतेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पडोसेतील घटना घडली तो लोकवस्तीचा परिसर असल्याने संध्याकाळच्या वेळी लहान मुले व इतरांचा वावर या भागात असतो. वारंवार गोळीबार होत असल्याने कोणावरही कारवाई का होत नाही, पुन्हा गोळीबार होऊन अनर्थ घडला तर याला कोण जबाबदार,अशी विचारणा करून प्रशासनाच्या नाकर्तेपणावर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. ∙∙∙

रामा काणकोणकरच्या आरोग्याची चर्चा

रामा काणकोणकर यांच्या प्रकृतीविषयी नवीन चर्चांना आता जोरदार ऊत आला आहे. न्यायालयात त्यांच्या वकिलांनी ‘ते अजूनही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्थिर नाहीत’ अशी स्पष्ट मांडणी केली. यानंतर बाहेरच्या जगात वेगळीच चर्चा सुरू झाली. कारण रामा काणकोणकर पत्रकारांशी बोलताना दिसले होते आणि तेव्हा त्यांची तब्येत ‘ठीकच दिसतेय’ अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली होती. सामाजिक कार्यकर्त्यांच्या वर्तुळात या मुद्द्यावर चर्चा सुरू असून, कोणी सहानुभूती व्यक्त करत आहेत, तर कोणी संपूर्ण परिस्थितीकडे संशयाने पाहत आहेत. सध्या तरी रामा काणकोणकर यांच्या आरोग्यस्थितीवर आणि त्याच्याशी संबंधित न्यायालयीन सूचनांवर राज्यभर विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. ∙∙∙

सभेत मोदींचा जय जयकार

पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी आणि भगवान श्रीरामाच्या भव्य ७७ फूट उंच मूर्तीच्या अनावरण सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती हे प्रमुख कारण होते. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात घडवलेला विकास त्यांच्या चातुर्मासातील व्रताचरणामुळे अन् सेवाभावी वृत्तीमुळे असे सांगून पर्तगाळ जीवोत्तम मठाधीश श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामीजींनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. शिवाय त्यांनी मोदींनी एकादशीचे व्रतही करावे, अशी सूचना केली. ती सूचनाही पंतप्रधान मोदींनी स्वीकारल्याचे सांगताच सभास्थळी मोदी-मोदी असा जयजयकार सुरू झाला. शिवाय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही ‘मोदींचा विजय असो’ असा घोष करताच उपस्थितांनी मोदी-मोदी असा घोष लावला. ∙∙∙

रजनीकांत उवाच!

‘पुन्हा जन्म मिळाला तर अभिनेताच होईन’, अशी ग्वाही ‘थलैवा’ ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी इफ्फीत दिली. रजनीकांत यांच्या नावावर अनेक विनोद लोकप्रिय आहेत. जगावेगळी काहीही गोष्ट घडायची असेल तर ते केवळ रजनीकांत यांनाच शक्य आहे, असेही विनोदाने म्हटले जाते. पुन्हा शंभर जन्म मिळाले तरी रजनीकांत म्हणूनच जन्माला येईन, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या ‘शिवाजी द बॉस’ चित्रपटातील प्रसंगानुसार अन् त्यांच्या जिवंत अभिनयाप्रमाणे काहीही किमया करू शकतात, अशी चर्चा इफ्फी प्रांगणात चालली होती. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: कौटुंबिक वादातून चुलत भावाचा प्राणघातक हल्ला, 23 वर्षीय तरुण गंभीर जखमी; काणकोणातील धक्कादायक घटनेने खळबळ

Labh Drishti Yog 2026: शुक्र-शनीचा 'लाभ दृष्टी योग'! 15 जानेवारीपासून पालटणार 'या' 5 राशींचे नशीब; धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाच्या पराभवाचा खरा विलन कोण? कर्णधार आयुष म्हात्रेची 'ती' चूक भारताला पडली महागात!

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! पाकिस्ताने भारताला 191 धावांनी नमवत उंचावला विजयाचा 'चषक' VIDEO

VIDEO: बापरे! ट्रकखाली जाता जाता वाचला... तरुणांचा जीवघेणा थरार व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ओढले ताशेरे

SCROLL FOR NEXT