Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Venzy Viegas statement: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधी पक्षांमध्ये युती करण्याच्या चर्चेवर आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी महत्त्वपूर्ण विधान केले
Venzy Viegas AAP Goa
Venzy Viegas AAP GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधी पक्षांमध्ये युती करण्याच्या चर्चेवर आम आदमी पक्षाचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी मोठे आणि महत्त्वपूर्ण विधान केले आहे. 'आप' आणि 'रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टी' यांची मुळे समान आहेत. त्यामुळे कोणतीही युती करायची झाल्यास, त्याचा निर्णय गोमंतकीय जनता आणि पक्षाच्या कोअर कमिटीने घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

'स्टिंग ऑपरेशन'नंतरही लोक पक्षात

आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी यावेळी काँग्रेस आणि 'आरजी' यांच्या संभाव्य युतीवर तीव्र आक्षेप नोंदवला. व्हेन्झी व्हिएगस म्हणाले की, काँग्रेस आणि 'आरजी' यांची मूळ विचारप्रणाली समान नाही. तरीही ते केवळ 'गोव्यातील लोकांसाठी ऍडजस्ट' करायला तयार असल्याचे दिसत आहे.

काँग्रेस आणि आरजी यांची विचारसरणी एक नाही, तरीही ते एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, २०२२ च्या निवडणुकीत स्टिंग ऑपरेशनमधून पैसे घेताना सापडलेली लोकं अजूनही काँग्रेस पक्षाचा भाग आहेत. त्यांना हटवण्याची गरज आहे, पण कोणीही तसे करत नाही. यामुळे त्यांची युती होऊ शकणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Venzy Viegas AAP Goa
Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

उत्तर-दक्षिण एकत्र येण्याची कल्पना

व्हेन्झी व्हिएगस यांनी गोव्याच्या राजकीय युतीसाठी एक नवी कल्पना मांडली, "जर गोव्यातील लोकांना आणि पक्षश्रेष्ठींना उत्तर गोव्यातून मनोज परबआणि वीरेश बोरकर यांच्यासोबत दक्षिण गोव्यातून व्हेन्झी व्हिएगस आणि क्रूझ सिल्वा एकत्र पाहिजे असतील, तर त्यांनी तसा विचार सुरू करावा," असे आव्हान त्यांनी दिले.

भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज

भाजपला पराभूत करण्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी नेतृत्वाच्या स्वच्छ प्रतिमेवर जोर दिला. "जर आपल्याला खरोखरच भाजपचा पराभव करायचा असेल, तर आपल्याला स्वच्छ विचारसरणी असलेल्या नेत्यांची गरज आहे," असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. काँग्रेसने देखील याआधी चुका केलेल्या आहेत आणि त्या धुवून काढण्यासाठी ते हातमिळवणी करत असतील, तर ते आम्ही करणार नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या धोरणांवर टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com