Partgali Math Swar Zankar Dainik Gomantak
गोवा

77 फूट श्रीरामाच्या मूर्तीला अभिवादन करणार 77 कलाकार; पर्तगाळी मठात रंगणार 'स्वरझंकार', भक्ती संगीताचा अद्भुत कार्यक्रम

Partgali Math Swar Zankar: सादरीकरणांच्या या चमकदार मांदियाळीत, , 3 डिसेंबर रोजी 'स्वर झंकार' या कार्यक्रमाद्वारे गोव्यातील 77 नामवंत कलाकार भक्ती संगीत सादर करणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पर्तगाळ मठ संस्थांनच्या 550 वर्ष पूर्तीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची उधळण तिथे रोज सादर होत आहे.  राष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाचा आनंद लोक घेत आहेत. सादरीकरणांच्या या चमकदार मांदियाळीत, 3 डिसेंबर रोजी 'स्वर झंकार' या कार्यक्रमाद्वारे गोव्यातील 77 नामवंत कलाकार भक्ती संगीत सादर करणार आहेत.

गोव्याचे प्रसिद्ध गायक प्रवीण गावकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार झाला आहे. काही वर्षांपूर्वी प्रवीण गावकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील गायक कलाकारांनी कर्नाटकातील किनारी भागातील अनेक मंदिरांमध्ये गायनाचे कार्यक्रम सादर केले होते. ही एक प्रकारची भक्ती यात्राच होती.

उडपी येथील जगदीश पै यांना हा कार्यक्रम इतका आवडला होता की त्यांनीच पुढाकार घेऊन प्रवीण गावकर यांना, पर्तगाळ संस्थानात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये, गोव्याच्या कलाकारांना घेऊन 'स्वर झंकार' सादर करण्यासाठी उद्युक्त केले. विक्रमी 77 फुट उंच असलेल्या राम मूर्तीच्या अनावरणानिमित्ताने 77 कलाकारांना घेऊन भक्ती संगीतपर कार्यक्रम सादर व्हावा अशी संकल्पना त्यामागे होती. 

‘स्वर झंकार’ हा कार्यक्रम मूर्त रूपात येण्यासाठी गेले सहा महिने तयारी सुरू होती. श्रीराम आणि विठ्ठल या दोन दैवतांची स्तुती करणारी भक्ती गीते या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आली आहेत.‌ ही भक्तीगीते प्रचलित असली तरी त्यात प्रवीण यांनी सांगीतिकदृष्ट्या अनेक बदल केले आहेत. या गीतांना एका सूत्रात बांधण्यासाठी विशेष संहिता प्रवीण यांनी तयार केली आहे.‌

संजीवन अकादमीचे 52  गायक ही गीते गाणार आहेत. तबला, पखावज संवादिनी, बासरी, टाळ या भारतीय वाद्यांबरोबरच व्हायोलिन, गिटार या पाश्चिमात्य वाद्यांचा समावेशही संगीतासाठी केला गेला आहे. गोव्याचा पारंपारिक गजर, भजन आदींचा समावेश देखील या कार्यक्रमात आहे. या समूहातील प्रत्येक कलाकाराने या कार्यक्रमासाठी विशेष श्रम घेतले आहेत. 3 डिसेंबर रोजी सायंकाळी --- वाजता, 77 गोमंतकीय कलाकार सादर करणार असलेला हा ‘स्वर झंकार’ श्रवणीय असेल हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DEADLINE ALERT! फक्त 31 डिसेंबरपर्यंत वेळ! लगेच करा 'हे' काम, नाहीतर तुमचं 'PAN Card' होईल बंद

Quelossim: ..अन्यथा बस अडवू! केळशी सरपंचाचा इशारा; मोबोर मार्गावर प्रवाशांना अपमानास्पद वागणूक दिल्यावरून संताप व्यक्त

VIDEO: मॅच जिंकली, पण 'ही' गोष्ट विसरला! रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले, 'हिटमॅन असाच आहे'

Goa ZP Election: जि. पं. निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर! भाजपने यादी दिल्यानंतर 'शब्द' पाळला; 11 नावांची घोषणा

Goa Live News: 'युतीची चर्चा सुरू असताना यादी जाहीर करणे धक्कादायक'; काँग्रेसच्या घोषणेवर मनोज परब संतप्त

SCROLL FOR NEXT