

काणकोण : श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ मठाच्या पंचशताब्दी महोत्सवानिमित्त २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने २ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७. ३० वाजता जीवोत्तम मंडप पर्तगाळी येथे विशेष नांदी दर्शन हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
मठाधीश परमपूज्य श्रीमद विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या प्रेरणा आणि संकल्पनेतून साकारलेली ही कलाकृती गोमंतकातील प्राचीन नाट्यपरंपरेचा अद्वितीय अनुभव रसिकांना देणार आहे. त्यात पाचशे पंचाहत्तर कलाकारांचा सहभाग असेल.
गोमंतकातील अनेक देवस्थानांतून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या नाट्यपरंपरेत नांदी हा नाटकाचा मंगलारंभ मानला जातो. या परंपरेतील १५ देवस्थानांतील नांद्या तसेच संगीत नाटकांतील दोन प्रसिद्ध नांद्या संगीत शाकुंतल आणि संगीत मानापमान यांसह एकूण १७ नांद्यांचा भव्य कलाप्रयोग नांदी दर्शनमधून सादर होणार आहे.
कार्यक्रमासाठी १५ देवस्थानांची यादी पुढीलप्रमाणे- श्री चामुंडेश्वरी देवस्थान देऊळमळ- केपे; श्री महालक्ष्मी देवस्थान - बांदिवडे; श्री नवदुर्गा देवस्थान - मडकई; श्री मोहिनी देवस्थान सदोळशे - काणकोण; श्री महालक्ष्मी देवस्थान - पणजी; श्री विमलेश्वर देवस्थान - रिवण; श्री देवकीकृष्ण देवस्थान - माशेल; श्री वेताळ देवस्थान फातर्पा; श्री नागेश महारुद्र देवस्थान- नागेशी; श्री रामनाथ देवस्थान- रामनाथी; श्री लक्ष्मी मंदिर ट्रस्ट सांवरकट्टा - कुंकळळी; श्री दामोदर देवस्थान जांबावली; श्री अश्वथ नारायण देवस्थान मोखर्ड - काणकोण; श्री महालसा नारायणी देवस्थान, मार्दोळ; श्री कामाक्षी देवस्थान, शिरोडा.
कार्यक्रमाचे संगीत संयोजन योगीश सांबारी यांचे असून गोपाल प्रभू (ऑर्गन), दत्तराज शेट्ये (तबला), केदार धामस्कर (पखवाज), यतीन तळावलीकर (तालवाद्य), जितेंद्र बोरकर(रंगमंचव्यवस्था) व सूत्रसंचालन प्रा. भास्कर नायक करतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.