political journey of Ramesh Tawadkar from MLA to Speaker Dainik Gomantak
गोवा

सभापतीपदाच्या उमेदवारीने तवडकरांना बक्षिसी

काणकोणातून अभिनंदनाचा वर्षाव: पर्रीकरांच्या मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण कामगिरी

दैनिक गोमन्तक

काणकोण: सभापती हे संविधानिक पद आहे. सरकारला अपक्ष व मगोपच्या आमदारांचा पाठिंबा असला तरी भाजपला पक्षातील विश्वासू, एकनिष्ठ आमदाराची सभापती पदासाठी गरज होती. त्यासाठी काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांची सभापतिपदाचा उमेदवार म्हणून निवड करून भाजपने त्यांच्या पक्षनिष्ठेची बक्षिसीच दिली आहे.

2017 सालची अपवादात्मक अपक्ष उमेदवारी सोडल्यास रमेश तवडकर हे पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. त्यानंतर भाजपने सन्मानाने त्यांना पक्षात घेऊन भाजपच्या राज्य समितीचे उपाध्यक्ष पद दिले. तसेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजपच्या केंद्रीय आदिवासी समितीचे उपाध्यक्ष पदही दिले. या दोन्ही पदांना त्यांनी आपल्या परीने न्याय दिला.

तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या तवडकरांना 2012 मध्ये मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यात आले. कृषी, पशुसंवर्धन, क्रीडा व आदिवासी कल्याण खाते त्यांच्याकडे होते. त्यांनी या सर्व खात्यांना न्याय दिला. त्यांच्या कारकिर्दीत आदिवासींच्या कल्याणासाठी अभिनव योजना सुरू झाल्या. पशुसंवर्धन खात्यालाही ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यात ते यशस्वी ठरले. कृषी खात्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त करून देऊन शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी ऑर्किड फुलशेतीची योजना राबविली. तसेच त्यांनी पक्ष संघटनाही मजबूत केली. कार्यकर्त्यांना वर्षभर पक्षकार्यात व्यस्त ठेवले. संघटनात्मक कार्य करण्यात त्यांचा हात धरणारा काणकोणात नेता नाही. पर्यटनाला चालना देण्यासाठी दरवर्षी आदर्श युवा संघाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे लोकोत्सवाचे आयोजन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT