‘आरजी’चे भवितव्य वीरेश बोरकरांवर अवलंबून

प्रादेशिक पक्षात क्रमांक ‘एक’वर रिव्होल्युशनरी गोवन्स
Revolutionary Goans News, RG News, Viresh Borkar News
Revolutionary Goans News, RG News, Viresh Borkar NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सांत आंद्रे मतदारसंघातून निवडून आलेले रिव्होल्युशनरी गोवन्सचे एकमेव उमेदवार वीरेश बोरकर हे आता विधानसभेत प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या विधानसभेतील कामकाजावर ‘आरजी’चे भवितव्य अवलंबून आहे. (RG News)

‘आरजी’ पक्षाचा एक तरी उमेदवार जिंकून येईल का, याची शाश्‍वती राजकीय विश्‍लेषकांना देखील नव्हती. मात्र, यंदाच्या निवडणूक निकालाने हे विधान खोटे ठरवले आहे. त्यातच ‘आरजी’ला मिळालेली मते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, हेही देखील तितकेच खरे. यापुढे ‘आरजी’ला नगण्य समजणे धोक्याचे ठरू शकते, याचा प्रत्यय राजकीय नेत्यांना आल्यावाचून राहिलेला नाही.

Revolutionary Goans News, RG News, Viresh Borkar News
नव्या मंत्रिमंडळात सासष्टीची उपेक्षा

वीरेश बोरकरांचा विजय जरी निसटत्या मताधिक्याने झाला असला तरी त्यांना गृहीत धरता येणार नाही. कारण ‘आरजी’ला यंदाच्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. म्हणजेच आरजी पक्ष हा प्रादेशिक पक्षांमध्ये क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. भाजप व कॉंग्रेस नंतर सर्वाधिक मते ‘आरजी’ला प्राप्त झाली असून या स्पर्धेत त्यांनी मगो व गोवा फॉरवर्डलाही मागे टाकले आहे.

वीरेश बोरकर हे आता ‘आरजी’चा विधानसभेतील चेहरा असल्याने गोमंतकीय त्यांच्या कामकाजाकडे बारकाईने लक्ष ठेवून असतील. वीरेश बोरकर विधानसभेत कशाप्रकारे प्रश्‍न मांडतात, ते पाहावे लागेल.

Revolutionary Goans News, RG News, Viresh Borkar News
गोव्यात आठ मंत्री मूळ काँग्रेसचे; तरीही केंद्राची पसंती

पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष

वीरेश बोरकरांना अतिशय संयमाने तसेच विचारपूर्वक पावले उचलावी लागणार आहेत. ते विधानसभेत कसे वागतात, कोणते प्रश्‍न लावून धरतात, त्याचसोबत एखाद्या विषयावर कोणती भूमिका घेतात यावर ‘आरजी’चे भवितव्य अवलंबून आहे. अनवधानाने एखादे चुकीचे पाऊल पडले तर त्याचा परिणाम ‘आरजी’ पक्षाला भोगावा लागू शकतो. त्यामुळे ‘आरजी’ची पुढची वाटचाल वीरेशच्याच हाती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com