Goa Schools Reopen: सोमवारपासून शाळा सुरु होत असल्याने आज पालकांनी आपल्या पाल्यांना स्कूल बॅगा आणि कंपास बॉक्स तसेच इतर साहित्य विकत घेण्यास बाजारात गर्दी केली होती. सातवी इयत्ता पासूनचे वर्ग या पुर्वीच सुरु झाले होते तसेच मध्यंतरी कोविड रुग्णांमध्ये वाढ झाल्याने हे वर्ग बंद करण्यात आले होते.
सोमवारपासून पहिली इयत्तेपासून वर्ग सुरु होत असल्याने बाजारात पालक स्कूल बॅगा व इतर साहीत्य विकत घेताना दिसत होते. गेल्या जवळ जवळ दोन वर्षांपासून पडून राहिलेल्या स्कूल बॅगा व कंपास बॉक्स व इतर शालेय साहित्याचा स्टॉक पडून होता. त्याला आज अक्समात मागणी आली. आज दिवसभरात जवळ जवळ 5 ते 10 हजार रुपया पर्यंतची विक्री झाली असे एका दुकानदाराने सांगितले. (Parents rush to the market to buy school supplies in goa)
वर्ग गुगल मीटवर होत असल्याने आमच्यावर शालेय साहित्य विकत घेण्याची पाळी आली नाही. पण आता पुस्तके व वह्या शाऴेत नेण्यासाठी स्कूल बॅगांची आवश्यकता भासली असे एका पालकाने सांगितले. स्कूल बॅगांची किंमत बाजारात 300 ते 800 रुपया पर्यंत उपलब्ध आहे. त्याही पेक्षा जास्त किंमतीच्या बॅगापण आहेत असेही हा पालक म्हणाला.
पुस्तके व स्टेशनरी दुकानांमध्ये थोड्याफार प्रमाणात गर्दी दिसत होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.