Paraskad News Canva
गोवा

Paraskad Crime: १४ वर्षांच्या मुलाने उचलले टोकाचं पाऊल, आईने पैसे न दिल्याचे कारण?

Paraskad Crime News: माऊली मंदिराजवळ पोरस्कडे-पेडणे येथे मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती पेडणे पोलिसांना पणजीहून प्राप्त झाली. मृतदेह गोमेकॉच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Paraskad Crime 14 year old death case

मोरजी : माऊली मंदिराजवळ पोरस्कडे-पेडणे येथे सायंकाळी ४ वा. मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती पेडणे पोलिसांना पणजीहून प्राप्त झाली. माहितीस अनुसरून माऊली मंदिराजवळ पोरस्कडे येथे घटनास्थळी भेट दिली असता, १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने आपल्या काकाच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचे आढळले.

पोलिस येण्यापूर्वीच मृताच्या काकांनी मृतदेह खाली उतरवला. घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी चौकशी केली. मृतदेह गोमेकॉच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत मुलाने आत्महत्या का केली, हे मात्र कळले नाही. मृताच्या कुटुंबीयांनी कोणताही गैरप्रकार नसल्याचे सांगितले. पेडणे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय साहिल नाईक पुढील तपास करत आहेत.

माध्यमांमधील वृत्तानुसार मुलाची आई ही परदेशात नोकरीला आहे. मुलगा आईकडे पैशांची मागणी करत होता. मात्र आईने पैसे द्यायला नकार दिला होता. यातूनच त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचे समजते. मात्र, पोलिसांकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1106 च्या ताम्रपटात उल्लेख असलेला गंडगोपाळ तलाव, करमळीचे सुलभातीचे तळे; गोवापुरीच्या जलव्यवस्थापनाचा लौकिक पुन्हा गवसेल?

Madhav Gadgil: खाण परिस्थिती नियंत्रणात आहे की नाही? गोव्यावर भरभरून प्रेम करणारे 'माधव गाडगीळ'

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

SCROLL FOR NEXT