Goa ABVP Dainik gomantak
गोवा

Goa ABVP : अभाविप’ कार्यकर्त्यांचा पणजीत मेळावा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa AVBP: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या वर्षी आपला ७५ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. ‘अभाविप’ ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना १९४९ मध्ये स्थापन झाल्यापासून ७५ वर्षांमध्ये पदार्पण करत आहे. या निमित्त अभाविपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा अभाविपचे पूर्व राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे व ‘अभाविप’ राष्ट्रीय मंत्री अंकिता पवार उपस्थित राहणार आहेत, असे अभाविप गोवा संयोजक धनश्री मांद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उत्तर गोवा संयोजक सुदीप नाईक, दक्षिण गोवा संयोजक अक्षय शेट व पणजी महानगर मंत्री वैभव साळगांवकर उपस्थित होते.

धनश्री मांद्रेकर यांनी सांगितले की हा मेळावा ९ जुलै रोजी सकाळी १० ते २ या वेळेत पणजी, गोवा येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात होणार आहे.

‘अभाविप’चे योगदान

अभाविप’ने शैक्षणिक सुधारणांसाठी, शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध लढा देण्यासाठी तसेच बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरी, दहशतवाद, माओवादी हिंसाचार, श्रीरामजन्मभूमी आंदोलन, कलम ३७० रद्द करणे आणि फुटीरतावादी प्रवृत्तींसह राष्ट्रासमोरील विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गोव्यात अभाविप अनेक वर्षांपासून विद्यार्थी आणि समाजहितासाठी सक्रियपणे काम करत आहे.

हाफ तिकीट आंदोलन, कोंकण रेल्वे आंदोलन, नायलॉन ६,६ आंदोलन, झेवियर्स कॉलेजमधील विद्यार्थी न्याय आंदोलन अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्यात अभाविपने मोठी भूमिका बजावली आहे .अलीकडे अभाविपने अनेक विद्यार्थी कल्याण कार्यक्रम आणि विद्यार्थी आंदोलने केली आहेत. मागील आठवड्यात, अभाविप ने डॉन बॉस्को कॉलेज पणजीत फी रचनेच्या मुद्द्यावर यशस्वीपणे हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांची २५ लाख एवढी फी रक्कम वाचवली. ‘अभाविप’ गोवा स्थापनेची ७५ वर्षे साजरी करत असताना वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित करेल.

धनश्री मांद्रेकर अभाविप गोवा संयोजक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT