Heat is increasing in Goa | Goa weather updates  Dainik Gomantak
गोवा

उकाडा वाढला, पणजीत एका दिवसात 5.1 अंशांनी तापमानात वाढ

पणजीतील रविवारचं तापमान चौदावं सर्वाधिक तापमान असल्याची नोंद

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे गोवेकरांची मात्र उन्हाने काहिली होताना दिसत आहे. रविवारी एकाच दिवसात तब्बल 5.1 अंशांनी तापमानात वाढ झाल्याचं हवामान खात्याने जाहीर केलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. (Goa weather updates)

रविवारी एका दिवसात गोव्याच्या (Goa) तापमानामध्ये 5.1 अंशांनी वाढ झाल्याने गोव्याचं कमाल तापमान 37.4 अंशांवर पोहोचलं आहे. पणजीतील हे चौदावं सर्वाधिक तापमान (Temperature) असल्याचं आतापर्यंतच्या उपलब्ध माहितीवरुन स्पष्ट होतं आहे. आतापर्यंत 13 वेळा पणजीचं कमाल तापमान 37.4 किंवा त्याहून अधिक नोंदवलं गेलं आहे. पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे आणि वातावरणाच्या खालच्या पट्ट्यातील उष्म्यामुळे गोव्याच्या तापमानात आणखी सामान्य तापमानापेक्षा 3-4 अंशांनी वाढ झाली आहे.

गोव्यात 17 मार्चपर्यंत वातावरण (Climate) असंच शुष्क असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर काही ठिकाणी मात्र 13 आणि 14 मार्चदरम्यान धुकं आणि दव पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने काळजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना पाण्याचं सेवन जास्त करण्याचं तसेच कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

Monsoon: पावसाळा संपायला अवघे 3 दिवस, तरी राज्यात पावसाची मोठी तूट; यंदा 36.41 इंच पाऊस कमी

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT