Goa Panjim Municipality Dainik Gomantak
गोवा

Panjim : पाच लाख घेणारा नगरसेवक कोण? महापालिकेत चर्चा

‘खऱ्या कुजबूज’ने खळबळ; कर्मचारीही बांधत होते नावाचा अंदाज

गोमन्तक डिजिटल टीम

पाटोवर एका प्रख्यात कंपनीची टोलेजंग इमारत उभारली जात आहे. त्या कंपनीने आपली कार्यालये रस्त्यावर थाटल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याने त्याविषयी आयुक्तांकडे तक्रार केली होती, परंतु ही कार्यालये थाटण्यासाठी एका नगरसेवकाने पाच लाख रुपये घेतल्याची माहिती त्या सामाजिक कार्यकर्त्याच्या हाती आली. त्यावर ‘गोमन्तक’च्या ‘खरी कुजबूज’ या सदरात तो नगरसेवक कोण? अशी विचारणा केली होती. यावरून सोमवारी दिवसभर त्या नगरसेवकाच्या नावाचा अंदाज कर्मचारी बांधत होते.

विशेष बाब म्हणजे याविषयी त्या सामाजिक कार्यकर्त्याने मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडेही केलेल्या तक्रारीविषयी माहिती दिली होती. त्यामुळे सोमवारी काही नगरसेवकांना मोन्सेरात यांनी आपल्या कार्यालयात बोलाविल्याने महापालिकेत आणखी चर्चेला उधाण आले होते. पाटोवरील भाग नक्की कोणाच्या प्रभागात येतो, यावरून कोण तो नगरसेवक, ज्याने पाच लाख रुपये घेतले त्याचा शोध काहीजण उत्सुकतेपोटी घेत होते. याशिवाय ‘खरी कुजबूज’ही अनेक मोबाईलच्या व्हॉट्सॲपवर व्हायरल झाली होती. आमदार मोन्सेरात यांच्यापर्यंत ही बाब गेली असली तरी त्यांच्या कार्यालयात नक्की काय झाले, हे काही समजू शकले नाही.

दरम्यान, एका प्रख्यात बांधकाम व्यवसायात असणाऱ्या कंपनीची इमारत पाटोवर उभारली जात आहे. त्या जागेच्या भोवती पत्र्याचे कुंपन असले तरी आतमध्ये पायलिंग सुरू असल्याने कंपनीने स्थलांतरित करता येणारी कार्यालये रस्त्यावर उभी केली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अशी कार्यालये रस्त्यावर उभारणे गुन्हा ठरतो, याची जाणीव सामाजिक कार्यकर्त्याने पणजी महापालिका आयुक्तांना करून दिली होती. त्यानुसार आयुक्तांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यास ती कार्यालये हटविण्यास सांगितले होते, परंतु ही कार्यालये थाटण्यासाठी नगरसेवकाने आर्थिक व्यवहार केल्याचे त्या कंपनीच्या अधिकाऱ्यानेच सांगितल्याने हे सर्व गौडबंगाल पुढे आले आहे.

नाव अद्याप गुलदस्त्यात!

भाजप गटाच्या एका ग्रुपवरही नगरसेवकाविषयीची ‘खरी कुजबुज’ व्हायरल झाल्याने काहींनी थेट नावाचे अंदाजच व्यक्त केले. काहींनी तर ज्या प्रभागात हा परिसर येतो, त्या संबंधित नगरसेवकाला मोबाईलवरून संपर्क साधून विचारणा सुरू केली, परंतु एका नगरसेवकाने ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीकडे संपर्क साधत संबंधिताचे नाव विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु नावाचा उलगडा न झाल्याने काहींची निराशाही झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT