Goa Municipal Election Dainik Gomantak
गोवा

Goa Municipal Election: महापालिका निवडणूक; बाबूश यांना घेरण्याची तयारी, विरोधकांची 'एकसंध' मोर्चेबांधणी; उत्पलकडे नजरा...

Panajim Municipal Corporation elections 2026: पणजी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना घेरण्याची तयारी सुरू झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पणजी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना घेरण्याची तयारी सुरू झाली आहे. सध्या महापालिकेवर मोन्सेरात यांच्या गटाची सत्ता असून त्यांचे पुत्र रोहित हे महापौर आहेत.

विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पणजी विधानसभा मतदारसंघ आणि पणजी महापालिका यांच्या हद्दी जवळजवळ सारख्याच असल्याने पणजी महापालिका निवडणुकीत मोन्सेरात यांना रोखणे म्हणजे त्यांच्यासाठी विधानसभेची निवडणूक कठीण करणे असे समीकरण या हालचालींमागे आहे.

विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत अपक्ष लढून केवळ ७०० मतांनी पराभव पत्करावा लागलेले उत्पल पर्रीकर हे पून्हा विधानसभा निवडणुकीची तयारी करू लागले आहेत. त्यासाठी महापालिका निवडणुकीत आपले उमेदवार उतरवण्याची घोषणा त्यांनी केली आहे. महापालिकेच्या ३० प्रभागात त्यांचे किंवा त्यांचे समर्थन असलेले उमेदवार असतील, असे पर्रीकर यांचे समर्थक सांगत आहेत.

एकेकाळी भाजपचे ताळगावमधील नेते म्हणून ओळख असलेले दत्तप्रसाद नाईक यांनी आपले लक्ष केवळ दोन प्रभागांपुरतेच मर्यादित ठेवलेले नाही. त्यांनी मोन्सेरात विरोधी शक्तींनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विरोधी पक्षांनी मोन्सेरात विरोधी गट पणजी महापालिका निवडणुकीत एकसंधपणे उतरावा यासाठी प्रयत्न करावा असे जाहीर आवाहनही केले आहे.

एकदा तरी पणजीचा आमदार होता यावे अशी इच्छा बाळगून असलेले पणजीचे माजी महापौर सुरेंद्र फुतार्दो यांनीही आपण मोन्सेरात विरोधी गटातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करून रंगत वाढवली आहे. मोन्सेरात विरोधी मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी काही राजकीय शक्ती सक्रिय झाल्याची पणजीत चर्चा आहे.

३० प्रभागांचा सीमांकनाचा मसुदा प्रसिद्ध

नगरविकास विभागाने २०२६ मध्ये होणाऱ्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून पणजी शहर महानगरपालिका (सीसीपी) साठी ३० प्रभागांच्या प्रारूप सीमांकनाचा मसुदा प्रसिद्ध केला आहे.

विभागाने जारी केलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार, या मसुद्यात आगामी निवडणुकांसाठी शहराचे किती प्रभाग असतील आणि त्यांच्या सीमा कशा असतील याचा तपशील देण्यात आला आहे.

हा प्रारूप मसुदा २१ जानेवारी ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत (रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळता) सर्व कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत, तिसवाडी मामलतदार कार्यालय तसेच महापालिका कार्यालयात सार्वजनिक पाहणीसाठी उपलब्ध राहणार आहे.

या कालावधीत नागरिकांना या प्रारूप सीमांकनाबाबत सूचना, दुरुस्त्या अथवा बदल सुचविण्यास आमंत्रित करण्यात आले आहे. अशा सूचना तिसवाडीचे मामलेदार, पणजी यांच्याकडे सादर कराव्यात, असे पणजी येथील नगरविकास विभागाचे संचालक यांनी जारी केलेल्या सूचनेत नमूद करण्यात आले आहे.

उत्पलकडे नजरा...

काहीजण बाबूश पुढील निवडणूक सांताक्रुझमधून लढवतील अशीही चर्चा करत आहेत. रोहित यांना ताळगावमधून उमेदवारी मिळेल. त्यामुळे उत्पल यांचा पणजीतील मार्ग मोकळा होईल असा चर्चेचा सूर आहे. असे असले तरी बाबूश यांना रोखण्यासाठी सारी ताकद पणाला लावण्याची संधी उत्पल सोडणार नाहीत असे दिसते. विधानसभेतील पराभवाचा वचपा ते महापालिका निवडणुकीत काढतील का याकडे त्याचमुळे साऱ्या नजरा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New BJP President Goa Visit: भाजपचं 'यंग ब्रिगेड' मिशन! नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर; राजकीय हालचालींना वेग

Goa Road Safety: रस्ता सुरक्षा; नुवे येथे 'कार्मेल'च्या विद्यार्थिनींकडून जनजागृती मोहीम

Vasco Fish Market : 'पार्किंग व्यवस्थे'कडे होतेय दुर्लक्ष! वास्को नव्या 'मासळी मार्केट'कडे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

Mangal Gochar 2026: ग्रहांच्या सेनापतीची 'विजया'कडे कूच! मंगळ बदलणार नक्षत्र, 'या' 3 राशींना होणार अफाट धनलाभ; कष्टाचेही होणार चीज

Goa Politics: भाजपकडून खोटे दावे करून मतदारांना वगळण्याचा प्रयत्न, काँग्रेस नेते सावियो कुतिन्हो यांचा आरोप

SCROLL FOR NEXT