Goa Russian Murder: एकाच नावाच्या दोन रशियन महिलांची का केली हत्या? मारेकऱ्याच्या आईशी कनेक्शन! खुनाचं गुढ उकललं!

Goa Russian Murder Mystery: मोरजी आणि हरमल येथे दोन रशियन महिलांच्या झालेल्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले.
Goa Russian Murder Mystery
Goa Russian Murder MysteryDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मोरजी आणि हरमल येथे दोन रशियन महिलांच्या झालेल्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले. या प्रकरणी अटक करण्यात आलेला रशियन नागरिक आलेक्सेई लिओनोव्ह याच्या चौकशीतून आता अत्यंत धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी माहिती समोर येत आहे. आलेक्सेईने केवळ पैशांच्या वादातून किंवा रागातून या हत्या केल्या नसून त्याच्या गुन्हेगारी कृत्यामागे त्याच्या बालपणातील काही कटू स्मृती आणि एका विशिष्ट नावाप्रती असलेला टोकाचा तिरस्कार कारणीभूत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आलेक्सेईने ज्या दोन महिलांची हत्या केली, त्या दोन्ही महिलांचे नाव 'एलेना' (एलेना कास्थानोवा आणि एलेना वानीवा) होते. चौकशीदरम्यान आलेक्सेईने पोलिसांना सांगितले की, त्याच्या आईचे नावही 'एलेना' होते. बालपणात त्याच्या आईने त्याच्याकडे प्रचंड दुर्लक्ष केले होते, ज्यामुळे त्याच्या मनात आईबद्दल तीव्र संताप निर्माण झाला होता. हा राग इतका वाढला की, पुढे जाऊन त्याला 'एलेना' नावाच्या कोणत्याही महिलेबद्दल प्रचंड तिरस्कार वाटू लागला.

'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, तपासाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जरी हा तिरस्कार हत्येचे मुख्य कारण नसले, तरी यावरुन आरोपीच्या 'सायकोपाथिक' प्रवृत्तीची आणि त्याच्या बिघडलेल्या मानसिक स्थितीची कल्पना येते.

Goa Russian Murder Mystery
Russian Murder Case: 3 दिवसांत 2 खून! रशियन सिरीयल किलर गोव्यात सतत बदलायचा जागा; पोलिसांनी आवळला तपासाचा फास

आलेक्सेई हा गोव्यात (Goa) 'फायर डिस्प्ले' म्हणून काम करायचा आणि दोन्ही मृत महिलांशी त्याचे जवळचे संबंध होते. एलेना कास्थानोवा ही गो-गो डान्सर म्हणून काम करायची, तर एलेना वानीवा ही बबल परफॉर्मर होती. पोलिसांनी सांगितले की, आलेक्सेईचे या दोन्ही महिलांशी प्रेमसंबंध होते. मात्र, एलेना कास्थानोवा हिचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन आलेक्सेईने तिची हरमल येथे गळा चिरुन हत्या केली. तर, एलेना वानीवा हिची हत्या त्याने आर्थिक वादातून मोरजी येथे केली. दोन्ही घटनांमध्ये त्याने अत्यंत क्रूरपणे धारदार शस्त्राने त्यांचे गळे चिरले.

Goa Russian Murder Mystery
Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

आश्चर्याची बाब म्हणजे, आलेक्सेईने पोलिसांकडे असा दावा केला की त्याने यापूर्वी अनेक लोकांच्या हत्या केल्या आहेत. त्याने आसाममधील एका 40 वर्षीय महिलेच्या हत्येची कबुली दिली होती, जिचा मृत्यू 14 जानेवारी रोजी झाला होता. मात्र, वैद्यकीय तपासणीत त्या महिलेचा मृत्यू अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे झाल्याचे समोर आले.

Goa Russian Murder Mystery
Russian Woman Murder: 1 नाही, 2 रशियन महिलांचा खून! नाव-वय सारखे असल्याने वाढला गोंधळ; संशयित आरोपीच्या कबुलीने गोव्यात खळबळ

तसेच, त्याने एका परदेशी महिलेला (Women) मारल्याचाही दावा केला, परंतु ती महिला जिवंत असून तिने भारत सोडून काही काळ झाला असल्याचे तपासात आढळले. यावरुन आलेक्सेई हा केवळ गुन्हेगार नसून तो मानसिक व्याधीने ग्रस्त असल्याचे आणि स्वतःला एक 'सिरियल किलर' म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. सध्या गोवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा कसून शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com