Bank of India Dainik Gomantak
गोवा

Panjim 'एटीएम' समोर रात्री रंगतात मद्यपींच्या मैफल

Goa ATM साठी बँकेने सुरक्षा रक्षक नेमलेला नसल्याने या मद्यपींचे फावले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Crime: राजधानी पणजीमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सरस्वती इमारतीसमोरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) एटीएमसमोर रोज रात्री मद्यपींची मैफल जमत असल्याचे चित्र दिसून येते. या एटीएमसाठी बँकेने सुरक्षा रक्षक (Security Guard) नेमलेला नसल्याने या मद्यपींचे फावले आहे.

रात्री दहा वाजल्यानंतर एटीएमच्या दरवाजाबाहेर पायऱ्यांवर बसून काही मद्यपी खुलेआम मद्यपान करताना दिसतात. त्यापैकी एक-दोघे या परिसरातील पदपथावरच झोपत असल्याने इतर काहीजण त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी येतात.

तसेच, त्यांची मैफल रात्री उशिरापर्यंत रंगते. येथील काही व्यावसायिकांनी त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला; परंतु दुकाने बंद झाल्यानंतर दोन अडीच तासांनी ही मंडळी याठिकाणी ठिय्या मारतात. रात्री येथील एटीएममध्ये सहसा कोणी जात नसल्याने पायऱ्यांवर बसूनच त्यांचा मद्यप्राशनाचा कार्यक्रम सुरू होतो.

भटकी कुत्री, भिकाऱ्यांचीही जोड या फिरस्त्यांच्या जोडीला कमी की काय, म्हणून भटकी कुत्रीही येऊन त्या पदपथावर बसतात. राजधानीत सध्या भिकाऱ्यांची वाढलेली संख्या चिंताजनक बनली आहे. अनेक ठिकाणी चौकाचौकांत दुकानांच्या दारात, तसेच फुटपाथवर रात्री भिकारी झोपलेले दिसतात. अनेक व्यावसायिकांनी महापालिकेकडे याविषयी तक्रार केली आहे. परंतु त्यांच्याविषयी कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.

सुरक्षा रक्षकाचा अभाव: सध्या या एटीएमची ATM सुरक्षाही ‘रामभरोसे’ आहे. बँकेने या एटीएमसाठी सुरक्षा रक्षक नेमलेला नाही. हल्लीच राज्यात काही ठिकाणी एटीएम फोडून रोकड पळवण्याचे प्रकार घडले आहेत. तरीही याबाबत ना बँक व्यवस्थापन गंभीर आहे, ना पोलिस खाते. एखादा गैरप्रकार घडल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT