Colvale
Colvale Dainik Gomantak

Colvale: अवैध गांजा बाळगणाऱ्या दोघांना अटक

अवैध गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांवर केली कारवाई
Published on

कोलवाळ पोलिसांनी आज गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली. पोलिसांनी या कारवाईत आरोपीकडून एक किलो गांजा जप्त केला आहे. याबाबत रतन आवळे, अब्बास खरुशी या दोघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(Two accused arrested by Colvale Police along with 1 kg Ganja)

Colvale
Goa Crime News; कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या भामट्याला अद्दल घडवा: नागरिक संतापले

मिळालेल्या माहितीनुसार कोलवाळ येथे कर्नाटक येथील दोघे गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती कोलवाळ पोलिसांना मिळाली होती. यावरुन पोलिसांनी हाऊसिंग बोर्ड, कोलवळा येथे छापा टाकला. यावेळी रतन आवळे (वय 20), अब्बास खरुशी, ( वय 19) या दोन आरोपींना अटक केली असून आरोपींकडून 1 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच दोन्ही आरोपींवर NDPS कायद्याअंतर्गत कलम 20(b) आणि 29 अंतर्गत अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

Colvale
Goa Crime Investigation : गोव्यात तपास यंत्रणांची छापेमारी; आतापर्यंत 22 बांगलादेशी ताब्यात

चौकशीदरम्यान आरोपींनी महाराष्ट्राहून ड्रग्ज आणल्याची माहिती दिली असल्याने कोलवाळ पोलिसांचे पथक उद्या महाराष्ट्राला रवाना होणार आहे. व प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी तपास सुरु करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पर्यटन हंगाम सुरू होत असल्याने आरोपी संभाव्य ग्राहकांना अमली पदार्थ विकण्यासाठी आले होते. याचवेळी पोलिसांनी कारवाई केली.

ही कारवाई पीआय सोमनाथ महाजिक, पीएसआय सुशांत सांगोडकर, एलपीएसआय सोनम वेर्णेकर, हेड कॉन्स्टेबल सुनील मांद्रेकर आणि कॉन्स्टेबल सूरज किंलेकर, संदिप मलिक, विनायक पालव आदींचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com