fishing community Goa Dainik Gomantak
गोवा

Panjim News: '"पारंपरिक व्यवसाय मारू नका!'' मासेमारांची महानगरपालिकेकडे धाव; पणजीच्या महापौरांची 'टाळाटाळ'

Fishermen Protest Goa: पणजी काँग्रेस ब्लॉक अध्यक्षा प्रतिभा बोरकर यांच्या समवेत महानगरपालिकेत निवेदन देण्यात आले

Akshata Chhatre

पणजी: राज्यातील स्मार्ट सिटीच्या कामांमुळे कंपाल येथील ३० मासेमारी व्यावसायिकांना त्यांच्या जागेवरून हटवून दुसऱ्याजागी हलविण्यात होते, मात्र आता या मासेमारी व्यावसायिकांना पुन्हा एकदा त्यांच्या जागेवरून जाण्याचे आदेश देण्यात आलेत आणि म्हणूनच ही कैफियत घेऊन ३० मासेमारी व्यावसायिक मंगळवार (दि.८) रोजी पणजी काँग्रेस ब्लॉक अध्यक्षा प्रतिभा बोरकर यांच्या समवेत महानगरपालिकेत निवेदन देण्यात आले.

"पारंपरिक व्यवसाय मारू नका."

गोव्यात अनेक लोकांचा मासेविक्रीचा पारंपरिक व्यवसाय आहे आणि हा "पारंपरिक व्यवसाय मारू नका. आमची हक्काची जागा आम्हाला परत द्या किंवा आत्ताच्या जागी थोडी व्यवस्था करून द्या" अशा मागण्या महानगरपालिकेच्या निवेदनात मांडल्या गेल्या आहेत.

स्मार्ट सिटीने प्रकल्पाच्या वेळी या मासेमारी व्यावसायिकांना नवीन जागेचा प्लॅन दाखवण्यात आला होता, मात्र याचा कुठलाही लिखित दाखला नसल्याने "आम्हाला फसवण्यात आलेय, त्यांच्या सांगण्यावरून आम्ही दुसरीकडे गेलो होतो" असे मिलाग्रिस फर्नांडिस नावाच्या एका मासेमाऱ्याने यांनी माध्यमांना सांगितले. आत्तादेखील मासे विक्रेते कंपाल, पणजी इथून स्थानांतर करायला तयार आहेत मात्र एक व्यवस्थित आणि सुरक्षित कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी ते करत आहेत.

११ वाजता येणारे मेयर आलेच नाहीत!

पणजीत मासे विक्रेत्यांची समस्या घेऊन पणजी काँग्रेस ब्लॉक अध्यक्षा प्रतिभा बोरकर महानगरपालिकेच्या आवारात आल्या, मात्र ठराविक वेळेत कार्यालयात पोहोचून देखील पणजीच्या महापौरांनी जमावाला भेटण्यास टाळाटाळ केली. भला मोठा जमाव महानगरपालिकेकडे बघून महापौर आलेच नाहीत असं प्रतिभा बोरकर म्हणाल्या. या जमावाला न्याय हवाय, मात्र तो मिळवण्यासाठी ते कुठल्याही प्रकारचा मोर्चा किंवा आंदोलनं करत नाहीये तरीही त्यांच्या प्रश्नानं डावललं जात असल्याचा आरोप बोरकर यांनी केला.

स्मार्ट सिटीच्या सौंदर्यकारणात स्थानिकांना चरितार्थ करण्यापासून दूर ठेवलं जाणं बरोबर नाही. प्रत्येक माणसाला त्याचं जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि कुठलाही अधिकारी किंवा मुख्यमंत्री हा अधिकार काढून घेऊ शकत नाही असं पणजी काँग्रेस ब्लॉक अध्यक्षा प्रतिभा बोरकर म्हणाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT