Pandharpur Wari wikimedia commons
गोवा

Pandharpur Wari: मुळगाव वारकरी संस्थेचे १ जुलैपासून "विठ्ठल...विठ्ठल"

Mulgao News: प्रतिवर्षाप्रमाणे पंढरपूर पायी वारीचे आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

मुळगांव वारकरी संस्थेने प्रतिवर्षाप्रमाणे पंढरपूर पायी वारीचे आयोजन केले असून, ही त्यांची १४ वी वारी असून संस्थेचे संस्थापक ह.भ.प. भाऊ माऊली तथा रघुनाथ गोपी गाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची आखणी झाली आहे.

मुळगाव येथील श्री केळबाई देवीच्या मंदिरात दि.१ जुलै रोजी सकाळी ७ वाजता वारीत सामील वारकरी जमतील व तेथील देवीचे तसेच इतर देवतांचे दर्शन घेऊन विठ्ठल नामाचा गजर करीत तेथून प्रयाण करतील.

गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र असा पायी प्रवास असून, रोज रात्री मुक्कामाचे ठिकाण ठरलेले आहे. तेथे रात्री दिंडी, भजन, हरीपाठ होईल.

पायी वारीचे १३ जुलै रोजी संध्याकाळी पंढरपूर (Pandharpur) येथे आगमन झाल्यावर तेथील चंद्रभागेत सर्व वारकऱ्यांनी स्नान केल्यावर वारीची सांगता होईल. १८ जुलै रोजी वारीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे

एकूण २२५ वारकरी सामील झाले असून, सर्व विठ्ठलभक्तांनी १ जुलै रोजी सकाळी ७ वा. श्री केळबाई मंदिरात उपस्थित रहावे, असे आवाहन संस्था प्रमुख रघुनाथ गाड, तसेच संदीप सिनारी, उत्तम परब, रामचंद्र गावस, रोशन परब आदींनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT