Pandharpur Wari  Dainik Gomantak
गोवा

Pandharpur Wari : पंढरपूर पायी वारीत मिळतो जगण्याचा अमूल्य मंत्र! मारुती पाटील

Pandharpur Wari : माशेलात भक्तिमहोत्सव उत्साहात : समाजात एकतेचे दर्शन

गोमन्तक डिजिटल टीम

खांडोळा, जीवनात एकदा तरी वारी अनुभवायला हवी. कारण पंढरपूर वारीतून कसे वागावे, कसे आचरण करावे, याचे मार्गदर्शन होते. वारकऱ्यांच्या वारीमुळे सहकार्याची भावना निर्माण होते. उत्तम जीवन जगण्याचा अमूल्य मंत्र दिला जातो, असे मत वारकरी मारुती पाटील यांनी माशेल येथे भक्तिमेळाव्यात व्यक्त केले.

देवकीकृष्ण वारकरी मंडळातर्फे देवकीकृष्ण सभागृहात भक्तिमेळावा साजरा करण्यात आला. यावेळी विठ्ठल पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक ढवळीकर, पंच सुनील भोमकर, दामोदर नाईक, अपर्णा आमोणकर, प्रदीप हळदणकर उपस्थित होते.

ढवळीकर म्हणाले, पंढरीची वारी महत्त्वाची असून देवकीकृष्ण मंडळाचे वारकरी नियमित वारी करतात. गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी वारी सुरू असून या वारीमुळे एकतेचे दर्शन होते. एका वारीतून अलीकडे दोन वाऱ्या निघत आहेत.

विठ्ठल नामाचा जयघोष आरोग्यसाठीसुद्धा महत्त्वाचा आहे. सातत्याने विठोबाचे नामस्मरण केले तर मन प्रसन्न राहते. वेगळी ऊर्जा प्राप्त होते. याबाबत अलीकडील संशोधनाने सिद्ध झाले आहे. आजकालच्या वाढत्या ताणतणावाच्या वातावरणात ध्यानधारणा आवश्‍यक आहे. त्यासाठी ‘विठ्ठल विठ्ठल’ या नामघोषाने मनाला शांत लाभते आणि ताणविरहित आपण जगू शकतो, असे पाटील म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "POGO विधेयक एक दिवस विधानसभेत मंजूर होईल" मनोज

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT