Pandharpur Wari  Dainik Gomantak
गोवा

Pandharpur Wari: विठ्ठल भेटीची इच्छा अपूर्णच! पंढरपूर वारीचा पहिला दिवस अखेरचा; 74 वर्षीय वारकऱ्याचे हृदयविकाराने निधन

Warkari Heart Attack: आषाढी एकादशीनिमित्त गोव्यातून पंढरपूरकडे निघालेल्या पायी वारीतील एका वारकऱ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुःखद घटना घडली

Akshata Chhatre

दोडामार्ग: आषाढी एकादशीनिमित्त गोव्यातून पंढरपूरकडे निघालेल्या पायी वारीतील एका वारकऱ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुःखद घटना घडली आहे. शंकर काळू गाड (वय ७४) असे त्यांचे नाव असून, ते शिवोलकरवाडा-मुळगाव गोवा येथील रहिवासी होते. ही घटना शनिवारी (दि. २१) दोडामार्ग-वीजघर राज्यमार्गावर, आंबेली येथे संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली, ज्यामुळे वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.

अखेरची वारी, विठ्ठल भेटीची अपूर्ण इच्छा

मुळगावहून ही वारी सकाळी नऊ वाजता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. वारीचा पहिलाच दिवस होता आणि शेकडो वारकरी मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाले होते.

निवृत्त पोलिस कर्मचारी असलेले शंकर गाड हेही गेली १५ वर्षे न चुकता पायी वारीने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते. यंदाही ते त्याच श्रद्धेने निघाले होते.

शनिवारी सकाळी मुळगावातून निघालेली वारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग बाजारपेठेत पोहोचली. त्यानंतर, ही वारी पुढे आंबेली येथे सायंकाळी सहा वाजता पोहोचली असता, वाटेतच शंकर गाड यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खाली कोसळले.

तत्काळ रुग्णालयात, तरीही वाचले नाही प्राण

वारीसोबत असलेल्या वैद्यकीय पथकाने त्यांना तात्काळ दोडामार्ग येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. गोवा पोलिस दलात साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झालेले शंकर गाड हे एक निष्ठावान वारकरी होते.

वारीतील त्यांच्या एका सहकाऱ्याचा असा अचानक मृत्यू झाल्याने अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि सुना असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गाड कुटुंबावर आणि वारीतील सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

Bicholim Online Fraud: 'इन्व्हेस्टमेंट'च्या नावाखाली फसवणूक! लाखोंचा गंडा घालणाऱ्या संशयिताला मध्यप्रदेशातून अटक; डिचोली पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT