Cortalim Dainik Gomantak
गोवा

Cortalim: कुठ्ठाळी फेरी पॉईंटजवळ ‘जेटी’ला पंचायतीचा विरोध

Cortalim: जेटी उभारणीला कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ आणि कुठ्ठाळी पंचायतीने विरोध दर्शवला आहे.

दैनिक गोमन्तक

Cortalim: नदी जलवाहतूक विभागाने पर्यटन क्रियाकलापांसाठी कुठ्ठाळी फेरी पॉइंटजवळ जेटी उभारणीसाठी निविदा काढण्याच्या हालचाली सुरू केल्या असून याला कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ आणि कुठ्ठाळी पंचायतीने विरोध दर्शवला आहे. या समस्येबाबत कॅप्टन ऑफ पोर्ट्स यांची भेट घेतली आणि प्रकल्पाचा तपशील समजून घेण्यासाठी संयुक्त तपासणीची मागणीही केली.

आमदार किंवा पंचायतीलाही नदी परिवहन विभागाने विश्वासात घेतले गेले नाही, असा दावा वाज यांनी केला असून जेटीची निविदा काढण्यास हरकत घेणारे पत्रही जारी केले.वृत्तपत्रात प्रसिध्द झालेली जाहिरात वाचून आपण कुठ्ठाळीच्या सरपंच सेनिया पेरेरा यांना कळवले.

त्यावर पेरेरा यांनीही याबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले. वर्षापूर्वी जेटी पर्यटनासाठी देण्यात आली, तेव्हाही संपूर्ण गावाने याला विरोध केला होता. या जेटीचे बांधकामाला लोक अजूनही आक्षेप घेत आहेत,असेही वाज म्हणाले.

नदी परिवहन विभागाने आम्हाला विश्‍वासात घेतले नाही. कोणते उपक्रम होणार याची माहिती दिली नाही,त्यामुळे जेटीसंबंधी निर्णयाच्या पूर्णपणे विरोधात असून आम्ही योजनेला विरोध करतो. आम्ही चर्चेसाठी ग्रामसभा घेऊ. पंच सदस्य प्रकल्पाच्या पूर्णपणे विरोधात आहेत.

जेटीचा एक भाग आधीच देण्यात आला असून जेटी खाजगी कंपनीला देण्याची योजना असताना पंचायतीला विश्वासात का घेतले नाही,असा सवाल परेरा यांनी केला. उपसरपंच दिव्या रायकर यांनी सांगितले की, पंचायतीला कळवल्याशिवाय अशा उपक्रमांचे नियोजन केले जाते हे पूर्णपणे चुकीचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अपमानास्पद भाषा, ईदच्या सजावटीची नासधूस, एकता नगरात तणाव; पोलिसांनी महिलेला घेतलं ताब्यात

Borim Accident: बोरीत काँक्रेटवाहू ट्रकची कारला धडक, 6 जण जखमी; 12 वर्षीय मुलीचा समावेश

''गोवा में 15 साल भाजप आ नहीं सकती''; दिगंबर कामतांचा Video Viral, मुख्यमंत्र्यांनी वाजवल्या टाळ्या; नेटकरी थक्क!

Asia Cup 2025 Winner Prediction: आशिया कप कोण जिंकणार? आकाश चोप्राचे भाकित चर्चेत! म्हणाला...

Kolkata Crime: कोलकाता पुन्हा हादरलं! बर्थ डे पार्टीतच 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; मित्रच ठरले कर्दनकाळ

SCROLL FOR NEXT